रविवार, 5 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Modified: सोमवार, 13 डिसेंबर 2021 (09:12 IST)

श्री सद्गुरू दत्ता कसं विसरू तुझं नाव सांग

श्री सद्गुरू दत्ता कसं विसरू तुझं नाव सांग,
तुझीया उपकाराचें कसे फेडू मी पांग,
घेऊन तुझं दर्शन, झालो मी धन्य धन्य,
नामस्मरण होता तुझे, भान राही न अन्य,
रंगुनी जावं वाटे तुझीया नामात दत्ता,
पुण्य हे पदरी बांधतो,हीच वेळ खरी आता,
संचित घेऊनी हे , जाईन पुढं मी मार्गी,
हीच इच्छा आता देवा, लावा जीवन सन्मार्गी.
काळाची ही गरज आता, दाखवा प्रकाश,
चेतवून प्रत्येकाला भेटवा त्याच्यातला ईश.
....अश्विनी थत्ते