शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दत्त जयंती
Written By
Last Updated : मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (07:49 IST)

Dattatreya Jayanti 2023 दत्त जयंती 26 डिसेंबर रोजी, पूजा विधी आणि आरती

Dattatreya Jayanti 2023 भगवान दत्तात्रेय हे कलियुगातील देवता मानले जातात. धार्मिक ग्रंथांमध्ये त्यांचे वर्णन ब्रह्मा, विष्णू आणि शिव यांचे संयुक्त अवतार म्हणून केले गेले आहे. त्यांना भगवान दत्त असेही म्हणतात. देशात भगवान दत्तात्रेयांची अनेक प्राचीन मंदिरे आहेत. पुराणानुसार त्यांचा जन्म मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला झाला होता. या दिवशी दत्त जयंती साजरी केली जाते. यावेळेस दत्तात्रेय जयंती कधी साजरी होणार जाणून घ्या-
 
दत्तात्रेय जयंती 2023 कधी आहे?
पंचांगानुसार यावेळी मार्गशीर्ष महिन्याची पौर्णिमा मंगळवारी, 26 डिसेंबर रोजी सकाळी 05:47 ते बुधवारी 27 डिसेंबर रोजी सकाळी 06:03 पर्यंत असेल. 26 डिसेंबरला पौर्णिमा तिथी दिवसभर राहणार असल्याने या दिवशी दत्तात्रेय जयंती उत्सव साजरा केला जाणार आहे. या दिवशी शुक्ल आणि ब्रह्म नावाचे दोन शुभ योग देखील असतील.
 
मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी मृग नक्षत्रावर सायंकाळी दत्ताचा जन्म झाला. 
 
याप्रकारे करा दत्ताची पूजा
स्नान वगैरे करून नंतर हातात पाणी व तांदूळ घेऊन व्रत व उपासनेचा संकल्प करावा.
 
घरातील स्वच्छ ठिकाणी लाल कपड्यावर भगवान श्री दत्तात्रेयांची मूर्ती किंवा चित्र स्थापित करा.
 
सर्वप्रथम फुले आणि हार अर्पण करा. कुंकुम लावून तिलक लावून शुद्ध तुपाचा दिवा लावावा.
यानंतर हातात फूल घेऊन या मंत्राचा जप करा आणि ते भगवान दत्तात्रेयाला अर्पण करा.
 
ऊं अस्य श्री दत्तात्रेय स्तोत्र मंत्रस्य भगवान नारद ऋषि: अनुष्टुप छन्द:,
श्री दत्त परमात्मा देवता:, श्री दत्त प्रीत्यर्थे जपे विनोयोग:।
आता भगवान दत्तात्रेयांना गुलाल, अबीर, चंदन इत्यादी वस्तू एक एक करून अर्पण करा. 
आपल्या इच्छेनुसार नैवेद्य दाखवा आणि आरती करा.
पूजेनंतर खाली दिलेल्या मंत्राचा किमान 108 वेळा जप करा. मंत्र जपण्यासाठी रुद्राक्ष जपमाळ वापरा-
ऊं द्रां दत्तात्रेयाय नम:
 
भगवान दत्तात्रेय आरती Aarti of Lord Dattatreya
त्रिगुणात्मक त्रैमूर्ती दत्त हा जाणा ।
त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा ।
नेती नेती शब्द न ये अनुमाना ॥
सुरवर मुनिजन योगी समाधी न ये ध्याना ॥
जय देव जय देव जय श्री गुरुद्त्ता ।
आरती ओवाळिता हरली भवचिंता ॥
सबाह्य अभ्यंतरी तू एक द्त्त ।
अभाग्यासी कैची कळेल हि मात ॥
पराही परतली तेथे कैचा हेत ।
जन्ममरणाचाही पुरलासे अंत ॥
दत्त येऊनिया ऊभा ठाकला ।
भावे साष्टांगेसी प्रणिपात केला ॥
प्रसन्न होऊनि आशीर्वाद दिधला ।
जन्ममरणाचा फेरा चुकवीला ॥
दत्त दत्त ऐसें लागले ध्यान ।
हरपले मन झाले उन्मन ॥
मी तू पणाची झाली बोळवण ।
एका जनार्दनी श्रीदत्तध्यान ॥