दिगंबरा दिगंबरा नामजपाने दत्त जयंती उत्सवाची सुरुवात झाली
इंदूर- श्री केशवानंद सरस्वती आश्रम ट्रस्ट, दत्त मंदिर वैशाली नगर येथे स्थित श्री दत्त माऊली भाविक मंडळातर्फे श्री दत्त महाराजांची 7 दिवसीय जयंती साजरी होत आहे. श्री वासुदेव दत्त यांच्या कृपेने श्रीमत्परमहंस परिव्राजकाचार्य सद्गुरु श्री केशवानंद सरस्वती (तांबे) स्वामी महाराज यांच्या कुटीच्या आवारात सायंकाळी साडेसहा वाजता शेकडो भाविकांनी आरती करून भगवान श्री दत्तांचे आशीर्वाद घेतले.
दिगंबरा दिगंबरा नामजपाने या संगीत महोत्सवाची सुरुवात झाली. कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात कु. निष्ठा दुचक्के, कु. कृतिका मुळे यांनी हिंदी व मराठी भाषेतील गायन सादरीकरण केले. 'राग यमन', 'ओंकार स्वरूपा', 'विष्णुमय जग', 'नारायण रमा रमणा' या गाण्यांचे सादरीकरण ऐकून उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. हार्मोनियमवर सुयश राजपूत, तबल्यावर धवल परिहार आणि विवेक थोरात यांनी दोन्ही कलाकरांना तालावर साथ दिली.
पहिल्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात प्रमोद गायकवाड, कु. नम्रता गायकवाड (पुणे) यांनी सुमधुर शहनाई वादनाने उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. किशोर कोरडे यांनी तबल्यावर साथ दिली.
श्री केशवानंद सरस्वती आश्रम ट्रस्ट, श्री चरणी राजंकित, श्री दत्त माऊली भाविक मंडळ इंदूर आश्रम येथे 20 डिसेंबर ते 26 डिसेंबर या कालावधीत श्री दत्त महाराजांची जयंती साजरी होत आहे. दत्त महोत्सवादरम्यान श्री दत्त मंदिरात आरतीची वेळ दररोज संध्याकाळी 06:30 असेल आणि कुटीतील आरतीची वेळ दररोज संध्याकाळी 07:00 वाजता असून नंतर नित्य पाठ आयोजित केले जात आहे.