सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

जेव्हा यमराजाला आली यमुनाची आठवण

भाऊबीज कथा
 
सूर्याची पत्नी संज्ञा यांना दोन मुलं होती. पुत्राचे नाव यमराज तर पुत्रीचे नाव यमुना असे होते. संज्ञा आपल्या पती सूर्याची किरण सहन करुन शकत नसल्यामुळे उत्तरी ध्रुवात सावली बनून राहू लागली. उत्तरी ध्रुवात वस्ती केल्यानंतर संज्ञाचे यमराज आणि यमुना यांच्यासोबत व्यवहारात अंतर येऊ लागले. यामुळे व्यथित होऊन यमाने आपली यमपुरीत आपले वास्तव्य केले. यमपुरीत आपला भाऊ पापी लोकांना यातना देतो हे यमुनाला बघवत नसल्यामुळे ती गोलोक चालली गेली.
 
नंतर एकेदिवशी यमाला यमुनाची आठवण आली आणि तो बहिणीला भेटायला गेला. त्यादिवशी त्याने नरकात पिचत पडलेल्या जिवांना त्या दिवसापुरते मोकळे केले. भावाला बघून बहिण खूप खूश झाली. तिने त्याचे आदरपूर्वक स्वागत केले, त्याला स्वादिष्ट जेवण खाऊ घातले. भावाने खूश होऊन वरदान मागायला सांगितले तेव्हा तिने म्हटले की प्रतिवर्ष या दिवशी बहिण आपल्या भावाला जेवू घालून त्याला ओवळेल त्या भावाला यमाची भीति राहणार नाही. यावर यमराज तथास्तू म्हणून यमलोकाकडे निघून गेले. 

तेव्हापासून कार्तिक शुक्ल द्वितीयला आपल्या भावाचा सत्कार करुन त्यांना ओवाळून बहिण भावासाठी जी प्रार्थना करते ती भावाला लाभते.