मंगळवार, 26 ऑगस्ट 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: मंगळवार, 30 ऑक्टोबर 2018 (13:02 IST)

धनत्रयोदशीचे खास मुहूर्त 2018

dhanteras
5 नोव्हेंबर 2018 रोजी धनत्रयोदशीनिमित्त सायंकाळी दागदागिने, द्रव्य, गणेश, विष्णू, लक्ष्मी, कुबेर, योगिनी, नाग, द्रव्यनिधी आदी देवदेतांचे पूजन करून नैवेद्य दाखविण्याची पद्धत आहे. वसुबारस मागोमाग येणारा दिवाळी सप्ताहातील महत्त्वाचा सण म्हणजे धनत्रयोदशी. 
 
या दिवशी सांयकाळी घरोघरी नागरिक धनलक्ष्मीचे पूजन करतात. देवदेवतांचे पूजन झाल्यावर पायसचा (खीर) नैवेद्य दाखविण्यात येतो. या दिवशी 'यमदीपदान' करण्याची पद्धत आहे. अवेळी येणार्‍या संकटापासून सुटका व्हावी, यासाठी 'दीपदान' करण्याची श्रद्धा आहे व्यापारीवर्गात 'धनतेरस' या नावाने धनत्रयोदशी साजरी केली जाते. पुढील आर्थिक वर्ष निर्वेध उलाढालींचे व्हावे या उद्देशाने बाजारपेठांत कुबेरपूजन करण्यात येते, अशी पद्धत आहे. 
 
धनत्रयोदशीचे खास मुहूर्त 
सूर्योदयापासून सकाळी 8.07 वाजेपर्यंत अमृत योग 
सकाळी 9.33 ते 10.57 शुभ   
दुपारी 3.13 ते सायं 6.02 लाभ - अमृत मुहूर्त आहे.     
या शुभ वेळेत वह्या आणाव्यात.