रविवार, 24 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By वेबदुनिया|

नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान करणे

कृती : व्यक्‍तीला प्रथम कुंकवाचा टिळा लावण्यात येतो. तिच्या अंगाला शरिराच्या वरच्या भागाकडून खालच्या भागाकडे तेल लावण्यात येते. नंतर तेल आणि उटणे यांचे मिश्रण एकत्रित करून अंगाला लावण्यात येते. मग तिला ओवाळण्यात येते. त्यानंतर तिने दोन तांबे उष्ण पाणी अंगावर घेतल्यावर तिच्यावरून आघाडा किंवा टाकळा यांची फांदी मंत्र म्हणत तीनदा फिरवावी.

इतर सूत्रे 
१. प्रथम शरिराला तेल लावल्यामुळे त्वचेतील रंध्रांतून शक्‍तीचे कण देहात पसरतात.
२. देहाला तेलमिश्रीत उटणे लावल्यामुळे देहात शक्‍तीची स्पंदने अधिक प्रमाणात निर्माण होतात, तर अभ्यंगस्नान करतांना चैतन्याची स्पंदने अधिक प्रमाणात निर्माण होतात आणि त्यांचे वातावरणात प्रक्षेपण होते.
३. नेहमीच्या आंघोळीपेक्षा नरकचतुर्दशीच्या दिवशी अभ्यंगस्नान केल्याने ५ टक्के अधिक लाभ होतो आणि वरील स्पंदने अधिक काळ देहात टिकून रहातात.