शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

Diwali 2023 Shubh Muhurat दिवाळीत 5 राजयोग, पूजेची योग्य वेळ जाणून घ्या

diwali
Diwali 2023 Shubh Muhurat: पंचागानुसार यावर्षी दिवाळीचा सण 12 नोव्हेंबर, रविवारी साजरा केला जात आहे. दिवाळीच्या दिवशी लोक देवी लक्ष्मीसह गणेश आणि देवी सरस्वतीची पूजा करतात. याशिवाय दीपावलीच्या रात्री शक्तीची प्रमुख देवता देवी कालीचीही पूजा केली जाते. म्हणून याला कालीपूजा असेही म्हणतात. पंचांग आणि ज्योतिषीय गणनेनुसार यावेळी दिवाळीत 5 विशेष योगायोग होणार आहेत. अशा परिस्थितीत दिवाळीला कोणते 5 राजयोग तयार होतील आणि पूजेसाठी कोणते शुभ मुहूर्त आणि उपासना सामग्री आहे हे जाणून घेऊया.
 
दिवाळीत 5 विशेष राजयोग तयार होतील
ज्योतिषीय गणनेनुसार यंदा दिवाळीत अनेक वर्षांनंतर 5 राजयोग निर्मित होत आहे. अशात दिवाळी अत्यंत खास असल्याचे मानले जात आहे. दिवाळीच्या दिवशी शुक्र, चंद्र, बुध आणि गुरु ग्रहांची शुभ स्थितीने 5 राजयोग बनत आहे. दिवाळीच्या दिवशी आयुष्मान योग आणि सौभाग्य योग याचे खास संयोग तर आहेच सोबतच या दिवशी शनि देव आपल्या स्वराशीत राहून शश महापुरुष नावाचा राजयोग तयार करत आहे.
 
दिवाळीत लक्ष्मी पूजनासाठी शुभ मुहूर्त
पंचांगानुसार दिवाळीत लक्ष्मी देवी आणि गणेश पूजासाठी शुभ मुहूर्त 12 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 40 मिनिटापासून ते संध्याकाळी 7 वाजून 35 मिनिटापर्यंत आहे. या दिवशी पूजेसाठी शुभ मुहूर्ताचा कालावधी 1 तास 53 मिनिटे आहे. प्रदोष काल संध्याकाळी 5:29 ते 8:06 पर्यंत आहे. तर वृषभ काळ संध्याकाळी 5.40 ते 7.35 पर्यंत आहे.
 
महानिशीथ काल पूजा-मुहूर्त
निशीथ काल पूजा मुहूर्त- रात्री 11 वाजून 39 मिनिटापासून ते 12 वाजून 30 मिनिटापर्यंत.
 
दिवाली शुभ चौघडिया मुहूर्त
अपराह्न मुहूर्त (शुभ)- दुपारी 1:26 ते 2:46 
संध्याकाळी (शुभ-अमृत-चर) 5:29 ते रात्री 10:25
 
या व्यतिरिक्त रात्री काल मध्ये पूजा मुहूर्त 1:44 ते 3:22 पर्यंत
उषाकाल मुहूर्त- सूर्योदयापूर्वीचा काल उषाकाल असतो या दरम्यान ब्रह्म मुहूर्त देखील असतो. दिवाळीत उषाकालासाठी शुभ मुहूर्त सकाळी 5:2 ते 6:40 पर्यंत असेल.