1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दिवाळी 2024
Written By
Last Updated : शुक्रवार, 1 नोव्हेंबर 2024 (09:23 IST)

Diwali Wishes 2024 दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा

Diwali wishes in Marathi
आली दिवाळी उजळला देव्हारा
अंधारात या पणत्यांचा पहारा
प्रेमाचा संदेश मनात रुजावा
आनंदी आनंद दिवसागणिक वाढावा
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
 
स्नेहाचा सुगंध दरवळला
आनंदाचा सण आला
विनंती आमची परमेश्वराला
सौख्य, समृध्दी लाभो तुम्हाला
आपणास आणि आपल्या परिवारास
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
 
फटाक्यांची माळ,
विजेची रोषणाई,
पणत्यांची आरास,
उटण्याची आंघोळ,
रांगोळीची रंगत,
फराळाची संगत,
लक्ष्मीची आराधना,
भाऊबीजेची ओढ,
दीपावलीचा सण आहे
खूपच गोड..
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...
 
दिवाळी अशी खास,
तिच्यात लक्ष्मीचा निवास…
फराळाचा सुगंधी वास,
दिव्यांची आरास…
मनाचा वाढवी उल्हास,
अशा दिवाळीच्या शुभेच्छा…
तुमच्यासाठी खास...
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा !!!
 
चंद्राचा कंदील घरावरी,
चांदण्यांचे तोरण दारावरी
क्षितीजाचे रंग रांगोळीवरी,
दिवाळीचे स्वागत घरोघरी
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा..
 
 दिवाळीची आली पहाट
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
 
संपू दे अंधार सारा 
उजळू दे आकाशात तारे
गंधाळल्या पहाटेस येथे 
वाहू दे आनंद वारे
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा.
 
 दिवाळीची आली पहाट
रांगोळ्यांचा केला थाट
अभ्यंगाला मांडले पाट
उटणी, अत्तरे घमघमाट
लाडू, चकल्या कडबोळ्यांनी सजले ताट
पणत्या दारांत एकशेसाठ
आकाश दिव्यांची झगमगाट
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा
 
दिवाळीचा पहिला दिवा लागता दारी,
सुखाचे किरण येती घरी,
पुर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा,
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
चिमूटभर माती म्हणे,
मी होईन पणती,
टीचभर कापूस म्हणे,
मी होईन वाती
थेंबभर तेल म्हणे,
मी होईन साथी
ठिणगी पेटताच फुलतीन
नव्या ज्योती
अशीच यासारखी फुलत
जावी आपली नाती.
दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा ...
Edited By - Priya Dixit