गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

Diwali Diya Rules दिवाळी पूजेत दिवा तुपाचा की तेलाचा लावावा, दिवे लावण्याचे नियम आणि मंत्र

diye
Diwali Diya Rules लोक दिवाळी या सणाची आतुरतेने वाट पाहतात, कारण दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मी आणि गणपतीची विशेष पूजा केली जाते. असे मानले जाते की जो कोणी दिवाळीच्या दिवशी लक्ष्मी देवीची विधीवत पूजा आणि आरती करतो, त्याच्या जीवनातून अंधार नाहीसा होतो. दिवाळीच्या संदर्भात एक समजूत आहे की लक्ष्मी आणि गणेश देवी पूजन करण्याबरोबरच या दिवशी दिवे लावल्याने कुटुंबात सुख-समृद्धी येते. इतकेच नाही तर दिवाळीच्या दिवशी योग्य दिशेला दिवा लावल्याने वास्तुदोषही दूर होतात असे वास्तुशास्त्र सांगते. अशा परिस्थितीत दिवाळीच्या पूजेदरम्यान तुपाचा की तेलाचा यापैकी कोणता दिवा लावणे शुभ ठरेल आणि या दिवशी दिवा लावण्याचे विशेष नियम काय आहेत हे जाणून घेऊया.
 
दिवाळीत दिवे लावण्याचे खास नियम
दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीची पूजा करताना दिवा, तुपाचा की तेलाचा लावावा याबद्दल लोकांमध्ये अनेकदा संभ्रम असतो. अशात दिवाळीच्या दिवशी दिवा कसा लावावा हे जाणून घेणे महत्त्वाचे ठरेल. मात्र दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीदेवीसमोर जो दिवा लावला जातो, तो आपल्या डाव्या हाताला लावावा. शास्त्रानुसार दिवाळीला देवी लक्ष्मीसमोर डाव्या हाताला तुपाचा दिवा लावावा म्हणजे या दिवशी लावलेला दिवा देवतेच्या उजव्या बाजूला असावा. तर तेलाचा दिवा उजव्या हाताकडे ठेवावा. या प्रकारे दिवा लावणे शुभ मानले जाते.
 
दिव्याच्या वात बद्दल
शास्त्रीय मान्यतेनुसार तुपाच्या दिव्यात पांढरी उभी वात म्हणजे फुलवात वापरावी. तेलाच्या दिव्याची लांब वात म्हणजे तेलवात असावी हे लक्षात ठेवा. पूजेमध्ये विशेष फळ मिळण्यासाठी तिळाच्या तेलाचा दिवा लावावा. तिळाचे तेल वापरत असल्यास वात लाल किंवा पिवळी रंगाची असल्याचे लक्षात ठेवले पाहिजे.
 
कोणत्या देवी-देवतांसमोर तुपाचा दिवा लावायचा?
धार्मिक मान्यतेनुसार, लक्ष्मी, भगवान गणेश, भगवान विष्णू, देवी दुर्गा आणि भगवान विष्णूची पूजा करताना तुपाचा दिवा लावणे अधिक योग्य मानले जाते.
 
दिवा लावण्याचा मंत्र
शुभम करोति कल्याणं, आरोग्यं धन संपदाम्। शत्रु बुद्धि विनाशाय, दीपं ज्योति नमोस्तुते।।