बुधवार, 24 सप्टेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Modified: बुधवार, 17 सप्टेंबर 2025 (15:39 IST)

शारदीय नवरात्री फराळाच्या यादीत ही खास रेसिपी लिहून घ्या

Delicious Bhagar Pulao Recipe
स्वादिष्ट भगर पुलाव रेसिपी 
साहित्य-
एक कप भगर 
एक मोठा बटाटा 
अर्धा कप शेंगदाणे
अर्धा चमचा जिरे
हिरव्या मिरच्या 
एक चमचा तूप
सेंधव मीठ 
कोथिंबीर 
कृती-  
सर्वात आधी भगर धुवून वीस मिनिटे भिजवा. आता पॅनमध्ये तूप गरम करा. जिरे, हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे घाला आणि परतून घ्या. आता बटाट्याचे तुकडे घाला आणि सोनेरी तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. भिजवलेली भगर आणि सेंधव मीठ घाला.व दुप्पट पाणी म्हणजे दोन कप घाला आणि चांगले मिसळा. पॅन झाकून ठेवा आणि मंद आचेवर भगर शिजेपर्यंत शिजवा. चला तर तयार आहे अपला भगर पुलाव रेसिपी, दही किंवा उपवासाच्या चटणीसोबत गरम पुलाव सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik