शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

Diwali Padwa 2023 या प्रकारे करावा साजरा

padwa
साडेतीन मुहूर्तातील एक मुहूर्त म्हणून या दिवसाला विशेष महत्त्व आहे. 
या दिवशी नव्याने खरेदी केलेल्या जमा-खर्चाच्या वह्यांचे पूजन करून लिखाणास प्रारंभ करतात.
कीर्द-खतावणीच्या नवीन वह्या सुरू करण्यापूर्वी वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. 
या दिवशी स्त्रिया पतीला ओवाळतात.
या दिवशी बलिप्रतिपदेचा दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात.  
नंतर बली प्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात.
दुपारी ब्राह्मण भोजन घालतात. 
या दिवशी गोवर्धन पूजा करण्याची प्रथा आहे.
गायी - बैलांना रंग लावून व माळा लावून सजवतात.
शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. 
श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे मांडून त्यांची पूजा करून मिरवणूक काढतात.
विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्य पदार्थ तयार करून श्रीकृष्णाला नैवेद्य दाखवतात.