शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By

Narak Chaturdashi 2022 नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान मुहूर्त 2022

Narak Chaturdashi 2022 muhurat
आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्दशी साजरी करतात. या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करून पूजा केली जाते. हा सण दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तेव्हा नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होऊ नये. कृष्णाने त्याला वर दिला आणि त्यानुसार नरकात जाण्यापासून वाचविणारे मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धती प्रचलित आहे. तर चला जाणून घेऊया नरक चतुर्दशी कधी आहे आणि पूजा आणि स्नानाची वेळ कोणती आहे.
 
नरक चतुर्दशी तिथी 2022 | Narak chaturdashi start and end date 2022: त्रयोदशी तिथि 23 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 6 वाजून 3 मिनिटापर्यंत राहील नंतर नरक चतुर्दशी प्रारंभ होईल. चतुर्दशी तिथी 24 ऑक्टोबर रोजी संध्याकाळी 5 वाजून 27 मिनिटापर्यंत राहील. उदया तिथी असल्याने नरक चतुर्दशी 24 ऑक्टोबर 2022 सोमवार रोजी साजरी केली जाणार. अरुणोदयाला चतुर्दशी साजरी करण्याचा नियम प्रचलित आहे.
 
नरक चतुर्दशी शुभ मुहूर्त | Narak chaturdashi shubh muhurat:
 
सूर्योदय : मुंबईच्या वेळेनुसार सकाळी 6.35 वाजता सूर्योदय होईल.
 
अभ्यंग स्नान मुहूर्त : सकाळी 5.04.59 ते 06.27.13 पर्यंत.
 
ब्रह्म मुहूर्त : सकाळी 4.56 ते 5.46 पर्यंत.
 
प्रातः संध्या आरती किंवा पूजा मुहूर्त : सकाळी 5.21 ते 6.35 पर्यंत.
अमृत काल : सकाळी 8.40 ते 10.16 पर्यंत. या काळात शुभ कार्येही करता येतील.
अभिजीत मुहूर्त : सकाळी 11.59 ते दुपारी 12.46 पर्यंत. या मुहूर्तावर पूजा, आरती किंवा खरेदी करता येऊ शकते.
विजय मुहूर्त : दुपारी 2.18 ते 3.04 पर्यंत.
 
नरक चतुर्दशीच्या दिवशी दिव्यांच्या प्रकाशाने अंधार दूर होतो. या दिवशी अभ्यंग स्नान करताना दिवे लावावे.