बुधवार, 9 ऑक्टोबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : रविवार, 12 नोव्हेंबर 2023 (00:04 IST)

Abhyang Snan 2023 नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नानाचे काय महत्त्व आहे जाणून घ्या

narak chaturdashi
Abhyang Snan 2023 अश्विन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. याला रूप चौदस आणि नरक निर्वाण चतुर्दशी,छोटी दिवाळी असेही म्हणतात. नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करतात, या दिवशी अभ्यंग स्नान करण्याचं महत्त्व आहे.  जे या उत्सवाच्या मुख्य पैलूंपैकी एक आहे. हिंदू मान्यतेनुसार, जे लोक नरक चतुर्दशीला अभ्यंग स्नान करतात ते स्वतःला नरकात जाण्यापासून रोखू शकतात.आणि सर्व पापातून मुक्त होतात. नरक चतुर्दशी  त्याच दिवशी किंवा कधीकधी लक्ष्मीपूजनाच्या एक दिवस आधी साजरी केले जाते. अभ्यंगस्नान सूर्योदयापूर्वी करावे, नरक चतुर्दशीच्या दिवशी दिव्यांच्या प्रकाशाने अंधार दूर होतो. या दिवशी अभ्यंग स्नान करताना दिवे लावावे. या दिवशी अभ्यंग स्नानाचे काय महत्त्व आहे जाणून घेऊ या. 
 
नरक चतुर्दशी 2023 महत्त्व
या दिवशी कृष्ण, सत्यभामा आणि काली यांनी नरकासुर राक्षसाचा वध केला. या दिवशी भाविक लवकर उठतात आणि आंघोळीपूर्वी अंगावर सुगंधी तेल लावतात आणि सुगन्धी उटण्याने अंघोळ करतात. नवीन वस्त्रे परिधान करतात. आणि देवळात जाऊन कृष्णाचे किंवा विष्णूंचे दर्शन करतात. संध्याकाळी फटाक्यांची आतषबाजी  करून उत्सवाचा आनंद लुटला जातो.

या दिवशी पुरुषांच्या अभ्यंगस्नानाचे विशेष महत्त्व आहे. सूर्योदयापूर्वी तिळाचे तेल लावतात. असं केल्याने त्यांचे गरिबी आणि दुर्दैवापासून संरक्षण होते या विश्वासाने हे सण साजरे केले जाते. असे मानले जाते की या दिवशी अभ्यंग स्नान केल्याने लोक नरकात जात नाही. 
 
नरक चतुर्दशीची कथा
 'नरक चतुर्दशी' याच्या नावातील 'नरक' या शब्दावरून हा सण मृत्यूशी किंवा यमराजाशीही कोणत्या ना कोणत्या स्वरूपात संबंधित आहे. या दिवशी यमराजाची पूजा केल्याने आणि उपवास केल्याने नरक जात नाही असे मानले जाते. हा सण 'रूप चतुर्दशी', 'काल चतुर्दशी' आणि 'छोटी दीपावली' म्हणून ओळखला जातो.या दिवशी मृत्यूची  देवता यमराज आणि धर्मराजा चित्रगुप्त यांची पूजा केली जाते आणि यमराजाला प्रार्थना केली जाते की तुमच्या कृपेने नरकाच्या भीतीपासून मुक्त होऊ द्या. या दिवशी भगवान विष्णूने वामन अवतारात राजा बळीला तीन पावले जमीन दान करण्यास सांगून, तीन पावलांमध्ये तीन जगांसह बळीचे शरीर मोजले. यमाला मृत्यूची देवता आणि संयमाची प्रमुख देवता मानली जाते.या दिवशी श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला होता. तेव्हा नरकासुराने कृष्णाकडे वर मागितला की जो कुणी या दिवशी सकाळी मंगलस्नान करेल त्याला नरकाची बाधा होणार नाही. कृष्णाने त्याला वर दिला आणि त्यानुसार नरकात जाण्यापासून वाचविणारे मंगल स्नान या दिवशी पहाटे करण्याची पद्धत प्रचलित झाली.
 
नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी उठून स्नान करणे आणि संध्याकाळी यमाला दिवा दान करणे शुभ मानले जाते. तात्पर्य असा आहे की जे संयमाने जगतात त्यांना मृत्यूची अजिबात भीती वाटणार नाही. या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करणे म्हणजे आळस सोडणे आणि  संयम आणि नियमाने जीवन जगल्यास आपले आरोग्य चांगले राहील आणि आपले रक्षण होईल .असा संदेश मिळतो. नरक चतुर्दशी साजरी करण्या संदर्भात अशीही एक कथा आहे की या दिवशी भगवान श्रीकृष्णाने प्राग्ज्योतिषपूरच्या दुष्ट राजा नरकासुराचा वध केला आणि असे करून त्याने पृथ्वीवरील लोकांनाच नव्हे तर देवतांनाही नरकासुराच्या अत्याचारापासून मुक्त केले.
 
नरकासुर हा एक दुष्ट आणि दंभी असुर होता. ज्यावेळी विष्णूंनी पृथ्वीचा उद्धार करण्यासाठी वराह अवतार घेतला, त्या वेळी ह्याचा जन्म पृथ्वीच्या गर्भेतून झाला होता. याचा जन्म झाल्यावर राजा जनकने नरकासुराचा सांभाळ केला पृथ्वीच्या गर्भातून त्याचा जन्म झाल्यामुळे पृथ्वी आपल्या बरोबर त्याला विष्णुलोकात घेऊन गेली.
 
विष्णूंनी त्याला प्राग्ज्योतिषपूर राज्याचे कारभार सांभाळायला सांगितले. श्री विष्णूंनी त्याला एक दुभेथ रथ दिले होते. नरकासुर हा मथुरा नरेश कंस याचा मित्र होता. नरकासुराचे लग्न विदर्भेच्या राजकन्या मायाशी झाले असे. नरकासुराने आपले शासन काही काळ व्यवस्थित केले पण त्याची मैत्री बाणासुराशी होती त्यामुळे त्याच्या  संगतीत राहून तो लोकांवर अत्याचार करायचा. सर्वीकडे त्याने आपल्या अत्याचाराने उच्छाद मांडला होता. त्याच्या जाचाला वैतागून एकदा ऋषी वशिष्ठ यांनी त्याला तुझी मृत्यू श्री विष्णूंच्या हस्ते होणार असे श्राप देखील दिले होते. त्या श्रापापासून वाचण्यासाठी त्याने ब्रह्मदेवाची कठोर तपश्चर्या केळी आणि ब्रह्मदेवांना प्रसन्न केले आणि त्यांच्या कडून मला कोणीही मारू शकणार नाही असे वर मागितले.
 
वर मिळवून त्याने स्वतःला अजेय समजून अनेक राजांना बंदिस्त करून त्यांच्या बायका, मुलींवर अत्याचार केले. त्याने तब्बल 16,100 बायकांना आपल्या कारागृहात दामटून ठेवले. त्याच्या अत्याचाराला सगळेच कंटाळले होते. सगळे देव, गंधर्व, मानवांना त्याचा त्रास होत होता. ते सगळे श्री विष्णूंकडे गेले. विष्णूंनी त्याला मारण्याचे ठरविले आणि कृष्णाच्या रूपात येऊन त्यांचा संहार केला. त्याचे महाल वेगवेगळ्या खंदकाने पाण्याने, अग्नीने वेढलेले होते. कृष्णाने गरूडावर बसून नरकासुराचे दोन तुकडे पाडले आणि त्याचा वध केला. कृष्णाने नरकासुराच्या कारागृहात बंदिवान असलेल्या 16,100 मुलींची सुटका केली.
 
कृष्णाने त्या 16,100 मुलींसह लग्न करून त्यांचा स्वीकार करून त्यांना मान मिळवून दिले. नरकासुराशी युद्ध करताना नरकासुराच्या रक्ताच्या काही थेंब कृष्णावर पडले होते ते स्वच्छ करण्यासाठी कृष्णाने तेल लावून स्नान केले होते. म्हणून तेव्हा पासून या दिवशी तेल लावून अभ्यंग स्नानाची प्रथा पाडली गेली.
 
नरकासुराचा अंत झाल्यावर त्याच्या आईने म्हणजेच पृथ्वी देवीने सर्वाना सांगितले की कोणीही त्याच्यांसाठी शोक करू नये. या उलट हा दिवस आनंदानं सण म्हणून साजरा करायचा. त्या वेळी पासून नरक चतुर्दशीचा सण साजरा केला जातो. 
या दिवशी लवकर उठून सूर्योदयाच्या पूर्वी अभ्यंग स्नान करून देवाची पूजा करावी. अभ्यंग स्नान केल्याने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतील.  
 
Edited By - Priya Dixit