शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: बुधवार, 20 ऑक्टोबर 2021 (17:53 IST)

दिवाळीच्या दिवशी देवी लक्ष्मीला हे नैवेद्य अर्पण करा

जर तुम्ही दिवाळी, शरद पौर्णिमा आणि शुक्रवारी लक्ष्मीला हे नैवेद्य अर्पण केले तर देवीचा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत राहील. परंतु हे लक्षात ठेवा की देवी लक्ष्मीची पूजा नेहमी भगवान विष्णू बरोबर केली पाहिजे.
 
लक्ष्मी भोग: लक्ष्मी देवीला संपत्तीची देवी मानले जाते. लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी, तिचे आवडते भोग लक्ष्मी मंदिरात अर्पण करावे.
 
लक्ष्मी देवीला मखाना, शिंघाडे, बत्ताशे, ऊस, शिरा, खीर, डाळिंब, सुपारी, पांढऱ्या आणि पिवळ्या रंगाची मिठाई, केशर आणि तांदूळ इत्यादी आवडतं. जो कोणी किमान 11 शुक्रवारी लाल फूल अर्पण करून लक्ष्मीजीच्या मंदिरात हे नैवेद्य दाखवतं, त्याच्या घरात सर्व प्रकारची शांती आणि समृद्धी असते. कोणत्याही प्रकारे पैशांची कमतरता भासत नाही.
 
पूजेदरम्यान, 16 प्रकारचे गुजिया, पापडी, अनारसा, लाडू अर्पण केले जातात. यानंतर तांदूळ, बदाम, पिस्ता, चुहारा, हळद, सुपारी, गहू, नारळ अर्पण केले जातात. केवडा फुले आणि आम्रबेले यांचा नैवेद्य दाखवला जातो.
 
विष्णू भोग: विष्णूजींना खीर किंवा रव्याचा शिरा याचा नैवेद्य आवडतो. खीर अनेक प्रकारे बनवली जाते. खीरमध्ये मेवे, नारळ, चारोळी, मखाना, सुगंधासाठी वेलची, काही केशर आणि शेवटी तुळस घालावी. ते उत्तम प्रकारे तयार करुन देवाला अर्पण केल्यानंतर इतरांना वितरित करा.
 
भारतीय समाजात हलव्याला खूप महत्त्व आहे. अनेक प्रकारचे हलवे बनवले जातात, पण रव्याचा शिरा विष्णूला खूप प्रिय आहे. रव्याच्या शिर्‍यामध्ये जवळजवळ सर्व प्रकारचे ड्राय फ्रूट्स मिसळावे आणि ते उत्तम प्रकारे तयार करुन देवाला अर्पण करावे. प्रत्येक रविवार, गुरुवार किंवा शुक्रवारी विष्णू-लक्ष्मी मंदिरात जाऊन आणि विष्णूला वरील सर्वोत्तम प्रकारचे भोग अर्पण केल्याने दोघेही प्रसन्न होतात आणि अशा भक्तांच्या घरात कोणत्याही प्रकारे संपत्ती आणि समृद्धीची कमतरता नसते.