बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (16:09 IST)

कोरोना काळात अशी साजरी करा दिवाळी, जाणून घ्या 8 खास गोष्टी

दिवाळीच्या सुट्या प्रत्येक कार्यालयात आणि शाळेत वेग-वेगळ्या असतात. पण यंदाच्या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शाळा बंदच आहे आणि कार्यालयात देखील जास्त करून वर्क फ्रॉम होमच म्हणजे घरातूनच काम सुरू आहे. अद्याप कोरोना संपलेला नाही. हे जाणून घेणं महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीत दिवाळीचा सहा दिवसाच्या सणा मध्ये आपण आपल्या प्रियजनांमध्ये दिवाळी साजरी केली तर बरे होईल. 
 
1 दिवाळी सुरू होण्या पूर्वी घराची साफ स्वच्छता, रंग रंगोटी करणं, पूजेच्या साहित्याची खरेदी करणं, कपडे खरेदी करणं आणि फटाके खरेदी करणं इत्यादी सर्व काम पूर्ण करावे. असं केल्याने आपल्याकडे धनतेरसच्या आणि दिवाळीच्या दिवशी बराच वेळ असणार. फक्त धन तेरसच्या दिवशी आपल्याला सोनं,चांदी, भांडी  खरेदी करायला जावे लागणार. पण हे लक्षात ठेवा की या वेळी बाजारपेठेत वर्दळ फार असणार अशा परिस्थितीत आपण आपल्या जवळ सेनेटाईझर बाळगा आणि सामाजिक अंतर राखा. आपल्या वैयक्तिक वाहनानेच ये जा करा.
 
2 धन तेरसच्या दिवशी शकुनाची वस्तू घेण्यासाठी दिवसातच खरेदी करण्यासाठी बाहेर पडा. बाकीचा वेळ आपण आपल्या परिवारासह घरातच राहून धनतेरस चा सण साजरा करावा. जर या दिवशी आपण बाहेर जेवणाची योजना आखत असाल तर आपल्याला अतिरिक्त खबरदारी घ्यावी लागणार.
 
3 दिवाळीच्या दिवशी घरीच राहून आपण चांगल्या प्रकारे दिवाळीचा सण साजरा करावा. आपण पूजेत कमी वेळ घालवला तरच आपण लोकांना भेटू शकता तसेच आपल्याला फटाके उडवण्याचा आनंद देखील घेता येईल. या साठी संध्याकाळी पहिल्या मुहूर्तावर लक्ष्मीची चांगल्या प्रकारे पूजा करून घ्यावी. 
 
4 जर आपल्या घरात गोवर्धन पूजा किंवा अन्नकूट उत्सव साजरा करत नाही तर आपण नरक चतुर्दशीला सकाळी लवकर उठून कुठे बाहेर जाण्याचा कार्यक्रम आखू शकता किंवा आपल्या कुटुंबीयाचा मध्ये दिवाळी भेटीचे समारोहाला भेट देऊ शकता. सर्व समारंभ दिवसात असल्यास अति उत्तम. दिवाळीच्या दुसऱ्या दिवशीच आपण आपल्या घरी 'दिवाळी भेटीचा' समारंभाचा आयोजन करून आपल्या सगळ्या नातेवाईकांना बोलवू शकता किंवा आपण त्यांचा घरी प्रत्येकाला भेट देऊ शकता.
 
आपणास या 10 गोष्टींची सावधगिरी बाळगायची आहे: 
सेनेटाईझर जवळ बाळगा, 
मास्क लावूनच ठेवा,
लोकांपासून योग्य अंतर राखा, 
कोठेही काहीही स्पर्श करू नये, 
हात मिळवणी करू नये,
खरेदी केलेल्या वस्तूंना सेनेटाईझ करावं, 
वर्दळीच्या ठिकाणी जाऊ नये, 
हातांना वेळो-वेळी धुवत राहा, 
खरेदीच्या वेळी हातात ग्लव्स घाला,
तोंडाला हात लावू नका जो पर्यंत आपण चांगल्या प्रकारे हात धुवत नाही.  
 
5 भाऊ बीजेला आपण आपल्या बहिणीकडे किंवा भावाकडे जाऊन हा सण साजरा करू शकता आणि कोठे बाहेर जाण्याची योजना देखील आखू शकता. जर आपली बहीण लांब राहते तर आपण सार्वजनिक वाहतूकने जाणे टाळावे. आपल्या वैयत्तिक वाहनानेच जावे. असं करणे शक्य नसल्यास तर या वेळी भाऊबीज चा सण साजरा करता येणं शक्य नसेल तर काळजी नसावी आपण व्हर्च्युल साधने भेटीसाठी वापरू शकता.
 
6 बरेचशे असं लोक देखील आहे जर आपल्या कामानिमित्त शहराच्या बाहेर किंवा राज्या बाहेर गेले आहे. तर त्यांना आपल्या घरी जाण्यासाठी लांब रजेची गरज असते. अशा परिस्थितीत ते आपल्या कुटुंबासमवेत शहरात निघून जातात. जर त्यांनी आपल्या सुट्ट्यांचा व्यवस्थित नियोजन केल्यास, दिवाळीला आपल्या घरात पूजा केल्यावर कोठे तरी बाहेर फिरायला जाऊ शकता. या साठी आपल्या वैयक्तिक वाहनांना वापरावे.
 
7 काही अशे लोक आहे जे विचार करतात की या वर्षीच्या दिवाळीला कोठे तरी जावं तर ते आपल्या गावात किंवा एखाद्या विशिष्ट नातेवाइकांकडे निघून जातात आपण देखील असं करू शकता. यंदाची दिवाळी आपण आपल्या संयुक्त कुटुंबातील सर्व सदस्यासह मिळून साजरी करू शकता किंवा एखाद्या खास जागेवर जाऊन देखील एन्जॉय करू शकता. या साठी आपण आपल्या वैयक्तिक वाहनांचा वापर करावा.
 
8 बऱ्याच भागात दिवाळीच्या निमित्त जत्रा भरतात. ग्रामीण भागात गाय गुरांना चांगल्या प्रकारे सजवतात आणि बऱ्याच प्रकारचे खेळ देखील होतात. पण आमचा आपल्याला सल्ला आहे की आपण वर्दळीच्या ठिकाणी जाऊ नये आणि आपल्या कुटुंबातील सदस्य आणि नातेवाइकांसह यंदाची दिवाळी साजरी करावी.