शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Updated : मंगळवार, 18 ऑक्टोबर 2022 (18:05 IST)

Vasu Baras: गाई, गुरांची दिवाळी, सुरवात त्याच्या पासून

Govats Dwadashi
लागली चाहूल, मनी आनंद जाहला,
वर्षभर ज्याची वाट प्रत्येकास, तो सण आला,
गाई, गुरांची दिवाळी, सुरवात त्याच्या पासून,
लखलखीत घर केलं घरच्या लक्ष्मीनं,
घर अंगण सजल, प्रसन्न झाले घरदार,
सुगंध फराळाचा दरवळू लागला चौफेर,
सजल्या बाजारपेठा नानाविध वस्तूंनी,
आबालवृद्ध आनंदले नवनवीन वस्त्रांनी,
आठवणीत राहावी अशीच साजरी  दिवाळी करावी,
वर्षभर त्याची ऊर्जा, प्रेरणादायी आम्हास व्हावी!!
..अश्विनी थत्ते
Published By -Smita Joshi