1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: मंगळवार, 7 नोव्हेंबर 2023 (12:12 IST)

Vasubaras 2023 वसुबारस कधी आहे ? जाणून घ्या महत्व आणि पूजा विधी

Vasubaras 2023 यंदा 9 नोव्हेंबर 2023 गुरुवारी गोवत्स द्वादशी म्हणजेच वसुबारस सण साजरा केला जाणार आहे. धार्मिक मान्यतेनुसार गोवत्स द्वादशी व्रत संततीच्या दीघार्युष्यासाठी ठेवण्यात येतो. द्वादशीची सुरूवार 9 नोव्हेंबरला 10.43 पासून सुरू होत आहे तर समाप्ती 10 नोव्हेंबरला 12 वाजून 36 मिनिटाला आहे.
 
वसुबारस व्रत महत्व आणि पूजन विधी
महत्व : कार्तिक आश्विन कृष्ण पक्षाच्या द्वादशीला गोवत्स द्वादशी साजरी करण्याची पद्धत आहे. वसुबारस या दिवशी गाई-वासराची पूजा केली जाते.
 
पुराणात गाईच्या प्रत्येक अंगात देवी-देवतांच्या स्थानाचे विस्तृत वर्णन आहे. पद्मपुराणानुसार चारही वेद गाईच्या मुखात वास करतात. त्याच्या शिंगांमध्ये भगवान शिव आणि विष्णू नेहमी वास करतात. गाईच्या पोटात कार्तिकेय, मस्तकात ब्रह्मा, कपाळात रुद्र, शिंगाच्या टोकावर इंद्र, दोन्ही कानात अश्विनीकुमार, डोळ्यात सूर्य आणि चंद्र, दातांमध्ये गरुड, जिभेत सरस्वती, सर्व गुद्द्वारात सर्व तीर्थक्षेत्रे, मूत्र स्थानात गंगाजी, रोम कूपांमध्ये ऋषी गण, पाठीमागे यमराज, दक्षिण पार्श्वमध्ये वरुण आणि कुबेर, वाम पार्श्वमध्ये पराक्रमी यक्ष, मुखात गंधर्व, नासिकेच्या अग्रभागी नाग, खुरांच्या मागच्या बाजूला अप्सरा स्थित आहे.
 
वसुबारस पूजन विधी
- दिवाळीचा पहिला दिवा या दिवशी लावला जातो. 
- गोवत्स द्वादशी या दिवशी गाई-वासराची पूजा केली जाते.
- सकाळी स्नानादि याने निवृत्त होऊन स्वच्छ वस्त्र धारण करावे.
- नंतर दध देणार्‍या गाईला वासरासह स्नान करावावे. त्यांना नवीन वस्त्र आणि हारफुलं अर्पित करावे.
- काही ठिकाणी लोक गायीची शिंगे सजवतात आणि तांब्याच्या भांड्यात अत्तर, अक्षत, तीळ, पाणी आणि फुले मिसळून गायीला स्नान घालतात.
- गायीच्या पायातील माती आपल्या कपाळावर लावावी.
- दारासमोर रांगोळी काढून दिवा लावावा.
- या दिवशी तिन्ही सांजेला गाय-वासरांना ओवाळावे.
- सायंकाळी गाई-वासराची पूजा करताना सूवासिनी गाईच्या पायांवर पाणी घालावे आणि हळद-कुंकू आणि अक्षता वाहाव्यात.
- ग्रामीण भागात किंवा ज्यांच्या घरी गुरे, गाई-वासरू आहेत, त्यांनी वसुबारस या दिवशी पुरणपोळीचा स्वयंपाक करुन गाई-वासराला नैवेद्य दाखवावे.
- या दिवशी उडदाचे वडे, भात आणि गोडाधोडाचे पदार्थ आवर्जून केले जातात.
- हे सर्व पदार्थ गाई-वासराला खाऊ घातले जातात.
- या दिवशी गाईचे दूध, किंवा दुधाने तयार पदार्थ तसेच गहू आणि तांदूळ खाण्यास मनाई आहे. 
- या दिवशी व्रत करणार्‍यांनी थंड बाजरीची भाकरी खावी. तसेच अंकुरलेले धान्य जसे मूग, हरभरा इत्यादींचे स्वीकार करून त्यापासून बनवलेला प्रसाद अर्पण करावा.