नरक चतुर्दशीला काय करावे
आश्विन कृष्ण पक्ष चतुर्दशीला नरक चतुर्थी साजरी केली जाते. नरकासुर राक्षसाच्या वधाप्रीत्यर्थ हा दिवस साजरा केला जातो. या सणाच्या निमित्ताने पहाटे सूर्योदयापूर्वी उठून अभ्यंगस्नान केले जाते. या दिवशी ब्राह्मणांना भोजन आणि वस्त्रांचे दानही दिले जाते.
या दिवशी सूर्योदयापूर्वी अंगावर तेल लावून स्नान करावे.
त्यावेळी खालील मंत्र म्हणावा.
'यमलोकदर्शनाभावकामोऽअभ्यंगस्नान करिष्ये।'
अर्धी आंघोळ झल्यावर आंघोळ करणार्याला औक्षण करावे.
या दिवशी गव्हाच्या पिठाचा एक दिवा तयार करून त्यात तिळाचे तेल टाकून, दिव्याच्या चारही बाजूला कापसाची वात लावून दिवा प्रज्वलित करावा. त्यानंतर पूर्वेला तोंड करून अक्षता आणि फुलांनी पूजा करावी. त्यासाठी खालील मंत्र बोलून देवालयात दिवा लावा.
'दत्तो दीप: चतुर्दश्यां नरक प्रीतये मया।।
चतु : वर्ती समायु सर्वपापापनुत्तये।।'
सूर्योदयानंतर स्नान करणाऱ्याचे वर्षभराचे शुभ कार्य नष्ट होते.
आंघोळ करून दक्षिणेकडे तोंड करून यमराजाची प्रार्थना केल्याने माणसाची वर्षभरातील पापे नष्ट होतात.
या दिवशी संध्याकाळी देवतांची पूजा केल्यानंतर घरामध्ये, बाहेर, रस्त्यावर इत्यादी सर्व ठिकाणी दिवे लावावेत.
घरातील प्रत्येक जागा स्वच्छ करून तेथे दिवा लावावा, ज्यामुळे घरातील लक्ष्मीचा वास आणि दारिद्र्य नष्ट होते.
अभ्यंगस्नानानंतर अपमृत्यू निवारणार्थ यमतर्पण केलं जातं. यानंतर आईने मुलांना ओवाळावे.
अनेक लोक अभ्यंगस्नानानंतर नरकासुराच्या वधाचे प्रतीक म्हणून कारीट (एक प्रकारचे कडू फळ) पायाने ठेचून उडवतात, तर काही जण त्याचा रस जिभेला लावतात.
या दिवशी दुपारी ब्राह्मणभोजन घालून वस्त्रदान करण्याचे देखील महत्त्व आहे.
प्रदोषकाळी दीपदान करावे.