बुधवार, 28 जानेवारी 2026
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. दीपावली
Written By वेबदुनिया|

आज वसुबारस

वसुबारस
WD
शनिवारी आश्विन कृष्ण द्वादशी. आज वसुबारस हा सण साजरा केला जातो. या सणापासूनच दीपावली पर्वाला प्रारंभ होत आहे, असे दांते पंचांगकर्ते मोहन दाते यांनी सांगितले.

वसुबारस, धनत्रयोदशी, नकरचतुर्दशी, बलिप्रतिपदा, लक्ष्मीपूजन, पाडवा आणि भाऊबीज या सणशंनी दिवाळी साजरा केली जाते. घर-अंगणात दिवे लावत अंध:कार दूर करणारा, अज्ञात मृत्यूचे भयनिवारण करणारा, इच्छा आकांक्षा बाळगणारा असा हा आल्हाददायक सण आहे.

वसुबारस दिवशी गायीची पाडसासह सायंकाळी पूजा करतात. सौभाग्यवती स्त्रिया एकभुक्त राहून सायंकाळी संवत्स म्हणजे वासरासह असलेल्या गायीचे पूजन करतात.

या दिवशी दूध, दुधाचे पदार्थ, तळलेले पदार्थ खात नाहीत. या दिवसापासून अंगणात रांगोळी काढून दिवाळी सणाची सुरुवात होते.