भाऊराया मी आज वाट पाहते तू नक्की येशील असे वाटते मी स्वत:ला समजते फार भाग्यवान बंधू लाभला मज त्या कृष्णासमान तुज आज मी औक्षण करीत सुखी ठेव माझ्या भावाला मागणी मागीन तुझ्या सहवासात आजचा दिवस घालवीन गोड चार घास तुला आनंदाने भरवीन मला नको तुझ्याकडून काही द्रव्यधन हवे आहे तुझे केवळ दर्शन आई-वडिलांची ऐकू दे खुशाली तुझ्या तोंडून भाऊबीज होत नाही साजरी तुझ्यावाचून.