बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. दिल्ली विधानसभा निवडणूक 2020
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 20 जानेवारी 2020 (12:15 IST)

केजरीवाल गॅरंटी कार्ड जाहीर; दिल्लीकरांना शब्द

दिल्लीतील जनतेला सध्या मिळणार्‍या मोफत सुविधा या पुढील पाच वर्षे ही मिळतील, असे आश्वासन मख्यमंत्री आणि आपचे नेते अरविंद केजरीवाल यांनी दिले आहे. तसेच यावेळी त्यांनी दिल्लीकरांना नवीन आश्वासनही दिले आहेत. 'केजरीवाल गॅरंटी कार्ड' या नावाने त्यांनी पक्षाच्या जाहीरनाम्याचा संक्षिप्त भाग प्रसिद्ध केला. 
 
दिल्लीकरांना देण्यात येणार्‍या मोफत सुविधा या पुढील पाच वर्षे कायम राहतील, असे आश्वासन त्यांनी दिले. यावेळी त्यांनी नवी आश्वासनही दिली. पाच वर्षांत दिल्लीला उजळून टाकू, असेही ते म्हणाले. आधीपासूनच लागू असलेल्या योजना  यापुढेही सुरू राहतील आणि काही योजना या पुढील पाच वर्षात पूर्ण करण्यात ये तील, असे केजरीवाल म्हणाले.