बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: सोमवार, 6 जानेवारी 2020 (10:34 IST)

दंगेखोरांच्या हातात राज्य देणार का?- अमित शहा

दिलीतल्या कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केजरीवाल यांच्या सरकारवर टीका केली. गेल्या पाच वर्षांमध्ये केजरीवाल सरकारने काम केले नाही. कार्यकाळ संपत आल्यानंतर ते कामाला लागले आहेत. असा आरोपही शहा यांनी केला.
 
दिल्ली सरकार जनतेची फसवणूक करत आहे. दिल्लीची जनता केजरीवाल सरकारचा जुना हिशेब चुकता करेल असेही अमित शहा म्हणाले. आगामी निवडणूक ही केवळ प्रचारसभेच्या माध्यमातून नाही तर लोकांच्या घराघरांमध्ये जाऊन लढायची आहे, असा सल्लाही त्यांना भाजपच्या कार्यकर्त्यांना दिला.