CAA च्या मुद्द्यावर भाजप एक इंचही मागे हटणार नाही - अमित शाह
"सर्व पक्ष जरी एकत्र आले तरी भाजप CAA च्या मुद्द्यावर एक इंचही मागे हटणार नाही. तुम्हाला हवा तितका गैरसमज तुम्ही पसरवा," असं आव्हान अमित शाह यांनी विरोधकांना दिलं.
दुसरीकडे, केरळ विधानसभेनं नागरिकत्व दुरुस्ती विधेयक नाकारल्यानंतर केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी भाजपेतर 11 राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलंय. केरळ विधानसभेनं जसं पाऊल उचललं, तशी भूमिका घेण्याचं आवाहन विजयन यांनी पत्राद्वारे केलंय. लोकशाही आणि धर्मनिरपेक्षता टिकवण्यासाठी एकत्र यावं, असंही ते पत्रातून म्हणालेत.