बुधवार, 8 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (10:57 IST)

आदेश दिल्यास PoK वर हल्ल्यास तयार - लष्करप्रमुख मनोज नरवणे

पाकव्याप्त काश्मीरसाठी (Pok) विविध योजना आहेत आणि कोणत्याही स्थितीत निपटण्यास तयार आहोत, असं भारताचे नवे लष्करप्रमुख मनोज नरवणे म्हणाले.
 
"भारताचं सैन्य जम्मू आणि काश्मीरसह सर्व सीमांवर तैनात आहे आणि आमच्याजवळ विविध योजनाही आहेत. आवश्यकता भासल्यास त्या योजना अमलात आणल्या जातील. आम्हाला जे सांगितलं जाईल, ते काम यशस्वीपणे पूर्ण करू," असं नरवणे म्हणाले.
 
नरवणे पुढे म्हणाले, "दहशतवादाचं उच्चाटन करण्यासाठी विशेष रणनीतीनुसार सैन्य काम करतं. आवश्यकतेनुसार रणनितीचं नियोजन केले जाईल."
 
चीनसंदर्भातही नरवणेंनी यावेळी एनडीटीव्हीशी बातचीत केली. ते म्हणाले, "भारत-चीन सीमेवर शांततेचं वातावरण असून, कुठलीही समस्या नाही."