बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 31 डिसेंबर 2019 (12:27 IST)

जनरल मनोज मुकुंद नरवणे हे नवे लष्करप्रमुख

लष्करप्रमुख जनरल विपिन रावत आज सेवानिवृत्त होत आहेत. त्यांची जागा आज मनोज मुकुंद नरवणे घेणार आहेत. लेफ्टनंट जरनल नरवणे हे अजूनही सेनाप्रमुख म्हणून कार्यरत होते. दुसरीकडे जनरल विपिन रावत हे देशाचे पहिले मुख्य संरक्षण संरक्षण कर्मचारी बनणार आहेत, त्यांचे नाव जाहीर झाले आहे, ते नवीन वर्षावर सीडीएसचे पद स्वीकारतील.
 
मनोज नरवणे हे भारतीय सेनेचे २८वे सेना प्रमुख आहे. ते ७ शीख लाईट इन्फंट्रीमध्ये १९८० साली भरती झाले. केद्र सरकारने लष्करात नव्या नियुक्त्या ची घोषणा केली आहे. मराठमोळे लेप्टनन जनरल मनोज मुंकुंद नरवणे यांची लष्कराच्या उपप्रमुखपदी नियुत्की करण्यात आली आहे. नरवणे यांनी लष्कर उपप्रमुख पदाची धुरा सप्टेंबरमध्ये सांभाळली. त्यापवूर्वी ते चीन बरोबर चार हजार किमी सीमेवर लक्ष ठेवणार्‍या पूर्व कमांडचे प्रमुख होते. आपल्या 37 वर्षांच्या सेवेत नरवणे यांनी अनेक मोहिमांचे नेतृत्व केले. शांती मोहिमांतही त्यांचा समावेश होता. जम्मू काश्मिर आणि ईशान्य भारतात त्यांनी शांतता प्रस्थापित करण्यात मोलाची कामगिरी बजावली. जम्मू काश्मिरमध्ये ते राष्ट्रीय रायफल्सचे प्रमुख होते. श्रीलंकेतील शांती सेनेत त्यांचा सहभाग होता. म्यानमारमधील भारतीय दुतावासाच्या संरक्षणाची जबाबदारी त्यांच्याकडे अनेक वर्ष होती. 
 
त्यांनी शीख इनफ्रंट्री रेजिमेंटमधून जून 1980मध्ये सेवेस सुरुवात केली. जम्मू काश्मिरातील उल्लेखनीय कामगिरीबाबत त्यांना सेना मेडल प्रदान करून गौरवण्यात आले आहे. नागालँडमध्ये कार्यरत असताना त्यांना अतिविशिष्ठ सेवा पदकाने गौरवण्यात आले होते.