बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

'वन मॅन शो, टू मेन आर्मी'चा खेळ खल्लास : शत्रुघ्न सिन्हा

झारखंड विधानसभा निवडणुकीत पराभवाचा सामना करावा लागलेल्या भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या शैलीत टीकास्त्र सोडले आहे. 

'वन मॅन शो आणि टू मेन आर्मी', तुमचा खेळ संपला आहे, अशा शब्दांत शत्रुघ्न सिन्हा यांनी हिणवले आहे. 'खामोश, झारखंड बीजेपी.... टाटा, बा-बा!', असेही आपल्या खास शैलीत त्यांनी  भारतीय जनता पक्षाला सुनावले आहे. सिन्हा यांनी ट्विट करत ही टीका केली आहे.