गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 3 जानेवारी 2020 (10:50 IST)

CAA : नरेंद्र मोदी म्हणतात, 'संसदेविरोधात नव्हे, पाकिस्तानविरोधात आंदोलन करा'

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायद्याला (CAA) विरोधक करण्यासाठी आंदोलन करणाऱ्यांवर टीका केलीय. काँग्रेस राज्यघटनला विरोध करत असल्याचं मोदी म्हणाले. ते कर्नाटकातील सभेत बोलत होते.
 
"जे लोक भारताच्या संसदेविरोधात आंदोलन करत आहेत, त्यांना मला सांगायचंय की, आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या कारनाम्यांना उघडं पाडण्याची गरज आहे. जर तुम्हाला आंदोलन करायचंच असेल, तर पाकिस्तानच्या गेल्या 70 वर्षांच्या कारनाम्यांविरोधात आंदोलन करायला हवं. पाकिस्तानविरुद्ध आवाज उठायला हवं," असं नरेंद्र मोदी म्हणाले.
 
मोदींच्या या टीकेवर काँग्रेसनं प्रत्युत्तर दिलंय. भाजपच्या ट्वीटला रिट्वीट करत काँग्रेसनं म्हटलंय की, "मोदीजी, आंदोलन संसदेविरोधात नसून, तुमच्या फुटीरतावादी धोरणाविरोधात आहे."
 
तसेच, "पाकिस्तानबाबत बोलायचं झाल्यास, 1948, 1965, 1971, कारगील या युद्धांमध्ये पाकिस्तानला ज्या जखमा दिल्यात, त्यातून ते अजून सावरले नाहीत. पाकिस्तानला धडा शिकवायचाय, तर बिर्याणी आणि आंब्याचा खेळ बंद करा," असं काँग्रेसनं म्हटलंय.