रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. ग्लासातल्या ग्लासात
Written By
Last Updated : गुरूवार, 19 सप्टेंबर 2024 (08:45 IST)

पोटाला थंडावा देते दुधीचे आरोग्यवर्धक ज्यूस

Bottle gourd
पोटाला थंडावा देण्यासाठी दुधीचे ज्यूस आरोग्यवर्धक मानले जाते. याच्या सेवनाने आरोग्याला अनेक फायदे मिळतात. यामध्ये असलेले पोषकतत्वे शरीराला अनेक फायदे पोहचवता. तर चला जाणून घेऊ या दुधीचे ज्यूस कसे बनवावे. 
 
साहित्य-
250 ग्रॅम दुधी  
3 कढी पत्ता दांडी 
1 मोठा चमचा काळे मीठ 
25 ग्रॅम कोथिंबीर
1 लिंबू 
 
कृती-
ही ज्यूस रेसिपी बनवण्यासाठी दुधीचे साल काढून धुवून घ्या. त्याचे तुकडे करून कोथिंबीर आणि कढीपत्ता घालून मिक्सरमध्ये फिरवून घ्या. नंतर हे मिश्रण गाळून घ्या. आता यामध्ये एक लिंबू पिळून छान ढवळून घ्या. त्यामध्ये काळे मीठ घालावे. तर चला तयार आहे आपले आरोग्यवर्धक दुधीचे ज्यूस. ज्यामुळे तुम्हाला पोटाला थंडावा देखील मिळेल. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik