Festival Posters
✕

कोशिंबीर ताक, साध्या ताकाला दिलेला हा खमंग तडका सध्या खूप लोकप्रिय; उन्हाळ्यासाठी उत्तम पर्याय

Updated: सोमवार, 11 मे 2026 (17:49 IST)
तेल किंवा तूप: १ मोठा चमचा
जिरे: १ छोटा चमचा
कढीपत्ता: ८-१० पाने
हिंग: चिमूटभर
 
कृती-
ताक तयार करणे: एका मोठ्या भांड्यात दही घेऊन ते रवीने व्यवस्थित घुसळून घ्या. त्यात थंड पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करा. ताक जास्त घट्ट किंवा जास्त पातळ नसावे.
मिश्रण तयार करणे: या ताकात बारीक चिरलेली काकडी, कोथिंबीर, किसलेले आले, मिरची, मीठ आणि साखर टाका. सर्व व्यवस्थित ढवळून घ्या.
तडका देणे: एका छोट्या कढल्यात तूप किंवा तेल गरम करा. त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की हिंग आणि कढीपत्ता टाकून गॅस बंद करा.
फायनल टच: हा गरम तडका तयार केलेल्या ताकावर ओता आणि लगेच झाकण ठेवा, जेणेकरून तडक्याचा सुगंध ताकात छान मुरेल.
सर्व्हिंग: २ मिनिटांनी झाकण काढून ताक हलवून घ्या. थंडगार सर्व्ह करा.
ALSO READ: उन्हाळ्याच्या दिवसात; चमचमीत जेवणासोबत लसूण-पुदिन्याचे थंडगार रायता नक्की ट्राय करा
खास टिप्स-
तुम्हाला आवडत असल्यास सर्व्ह करताना वरून थोडी खारी बुंदी टाकू शकता.
तडक्यासोबतच थोडी भाजलेल्या जिऱ्याची पूड टाकल्यास चव अजून वाढते.
काकडीची साल काढून ती अगदी बारीक चिरावी, जेणेकरून पिताना ती तोंडात छान लागते.
हे ताक तुम्ही दुपारच्या जेवणासोबत किंवा उन्हाळ्यात एक रिफ्रेशिंग ड्रिंक म्हणून घेऊ शकता.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: उन्हाळ्यासाठी एक अतिशय थंडगार आणि पौष्टिक पेय Mango Smoothie
Edited by-Dhanashri Naik
ALSO READ: उन्हाळा स्पेशल थंडगार चविष्ट कोकोनट मिल्क आईस्क्रीम
About Author
वेबदुनिया फीचर टीम
वेबदुनिया फीचर टीम ही केवळ तांत्रिक गोष्टींवर काम न करता, चालू घडामोडींच्या पलीकडे जाऊन जीवनशैली, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, साहित्य, आणि मानवी कथा अशा विविध श्रेणींमध्ये सखोल आणि रंजक माहिती देणारे विशेष लेख तयार करते. वाचकांना केवळ बातम्याच नाही, तर त्यांच्या आवडीच्या विषयांवर दर्जेदार आणि विश्लेषणात्मक वाचन साहित्य उपलब्ध करून देणे.... Read More

सर्व पहा

१०० रुपयांत धनत्रयोदशी पूजा आणि सोने-चांदी न घेता समृद्धी आणणारे ५ उपाय

अज्ञानापोटी लक्ष्मीचा अनादर नका करू! झाडू चौरस्त्यावर फेकण्यामागील अंधश्रद्धा उघड

केसातील कोंड्यावर उपाय जाणून घ्या

नोकरी करणाऱ्या महिलांसाठी ५-स्टेप स्किन केअर रुटीन; त्वचा दिसेल चमकदार आणि तजेलदार!

विषारी हवा फुफ्फुसांसह हृदय आणि मेंदूलाही पोहोचवते नुकसान; आरोग्याची अशी घ्या काळजी!

सर्व पहा

चेहऱ्यावर अकाली सुरकुत्या आणि म्हातारपणाची लक्षणे दिसू नयेत? तज्ज्ञांनी सांगितलेले हे ५ सौंदर्य मंत्र नक्की पाळा!

शाही तुकडा आणि बासुंदी: दिवाळीच्या पाहुण्यांसाठी झटपट बनणारे खास स्वीट डिश

प्रदूषणापासून मुलांचे संरक्षण करायचे आहे? योग्य मास्क निवडताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा!

हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये पदवीधर आणि डिप्लोमा उमेदवारांसाठी संधी, अर्जप्रक्रिया जाणून घ्या

कांद्याची साले फेकून देऊ नका! केस दाट, लांब आणि चमकदार बनवण्यासाठी असा करा वापर

पुढील लेख
Show comments