बीना साखरेचे तयार करा चॉकलेट बनाना आइसक्रीम
उन्हाळा येणार आहे, अशात तुम्ही तुमच्या घरीच आइसक्रीम बनवू शकता. हे चॉकलेट आइसक्रीम फारच हेल्दी असत कारण यात साखर, दूध आणि क्रीम नसून केळी असतात.
म्हणायचा तात्पर्य असा की यात फार कमी केलोरी असते. या आइसक्रीमला तयार करण्यासाठी तुम्हाला फ्रिजरमध्ये ठेवलेली केळीच युज करायचे असतात. त्याशिवाय तुम्हाला ब्लॅक कॉफीचा प्रयोग करायचा आहे, ज्याने ती केळींमध्ये चांगल्याप्रकारे मिक्स होऊ शकेल.
साहित्य - केळी - 3, थंड कोकोआ पावडर- 5 चमचे, कॉफी- 2 चमचे, बादाम- गार्निश करण्यासाठी.
विधी - फूड प्रोसेसरमध्ये केळी घालून काही सेकंड चालवावे. त्यानंतर यात कोकोआ पावडर, कॉफी आणि व्हेनिला घालून हे मिश्रण क्रिमी होण्यापर्यंत चालवावे. नंतर हे मिश्रण फ्रिजमध्ये जमण्यासाठी ठेवा. याला सर्व्ह करताना वरून बदामाचे स्लाइस लावावे.