कृती : पिकलेले लाल टोमॅटो घेऊन त्यांची साल काढून टाकावी. नंतर गर कुस्करून घ्यावे किंवा चाळणीने गाळून घ्यावे व त्यात पुरेसे पाणी घालून ते पाणी पाच मिनिटे उकळावे. नंतर तो रस तसाच घेऊन किंवा गाळून त्यात चवीप्रमाणे साखर, थोडी मिरची पूड व चवीपुरते मीठ घालावे. पाहिजे असल्यास बर्फ घालून प्यावयास द्यावे. हे पेय चविष्ट, पौष्टिक व उत्साहवर्धक आहे.