संबंधित माहिती
- Masala Pineapple Recipe उन्हाळ्यात आरोग्यदायी आणि ताजेतवाने करणारा नाश्ता
- Gulkand Kulfi recipe बाजारासारखी मलाईदार आणि सुगंधी गुलकंद कुल्फी आता घरीच बनवा
- वजन कमी करायचंय पण भूक कंट्रोल होत नाही? रात्रीच्या जेवणात 'या' ५ लाइट रेसिपीजचा करा समावेश
- लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती डिश Hotel-like delicious Manchurian Rice Recipe
- Tomato Pakora फक्त १० मिनिटांत बनवा कुरकुरीत टोमॅटोची जाळीदार भजी; पाहा सोपी रेसिपी
झटपट शेंगदाण्याची आमटी रेसिपी; टिफिनसाठी उत्तम
महाराष्ट्रीयन शेंगदाण्याची आमटी खूप सोपी, चटकदार आणि प्रोटीनयुक्त आहे. तर चला आज आपण पाहणार आहोत झटपट शेंगदाण्याची आमटी रेसिपी कशी बनवावी.
साहित्य-
शेंगदाणे (भाजलेले) -१ कप (साली काढलेले)
खोबरे (किसलेले) -१/४कप (ताजे किंवा सुके, वैकल्पिक)
हिरव्या मिरच्या - २-३
लसूण - ४-५ पाकळ्या
जिरे -१ चमचा
तेल / तूप -१-२ चमचे
हळद - १/२ चमचा
मीठ - चवीनुसार
गूळ -१-२ चमचे किंवा चिंचेचा कोळ -१ चमचा
पाणी - २-२.५ कप
कोथिंबीर
कृती-
सर्वात आधी मिक्सरमध्ये भाजलेले शेंगदाणे, खोबरे, हिरव्या मिरच्या आणि लसूण घाला. थोडे पाणी घालून बारीक किंवा थोडे खरबरीत वाटून घ्या. आता कढईत तेल/तूप गरम करा. त्यात जिरे टाका, हळद घाला. तुम्हाला हवे असल्यास यात बारीक कापलेला कांदा आणि लसूणही घाला त्यामुळे आणखी चव येते. वाटलेली शेंगदाण्याची पेस्ट घाला. चांगले परतून घ्या.नंतर २ कप गरम पाणी घाला. मीठ, गूळ किंवा चिंच घाला. तयार आमटीवर कोथिंबीर गार्निश करा. तर चला तयार आहे आपली झटपट शेंगदाण्याची आमटी रेसिपी, टिफीन मध्ये नक्कीच घेऊ जा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik
