कृती : सर्वप्रथम बदामांना 4-5 तास अगोदर पाण्यात भिजवाव्यात, चांगल्या भिजल्यावर सोलून साल काढा. साल काढून स्वच्छ केलेले बदाम पाणी टाकून घट्ट पण मऊ वाटावेत. कढईत लोणी टाकून वितळल्यावर त्यात मैदा टाकावा व हळू हळू मंदाग्नीवर साधारण गुलाबी रंगावर भाजावा. थंड झाल्यावर थोड्या पाण्यात गुठळ्या न होऊ देता चोपडा कालावा. नंतर एका पातेल्यात मैदा कालवलेला व वाटलेले बदाम मिश्रण टाकावे. सर्व मिश्रण ढवळून एकजीव करावे. नंतर त्यात चवीला मीठ, साखर, मिरेपूड व दूध टाकून चागंले उकळा. थोडे दाट झाल्यावर पातेले खाली उतरवून त्यात चीझचा कीस घालून चांगले मिसळा व गरम सूप सर्व्ह करा.