रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दसरा
Written By

Vijayadashami 2023 : विजयादशमीचा शुभ मुहूर्त

dussehra rangoli 2023
Dussehra 2023 Puja Muhurat आश्‍विन महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या प्रतिपदेपासून शारदीय नवरात्र‍ सण सुरु होतं तर 10 व्या दिवशी विजयादशमी सण साजरा केला जातो. दसर्‍याला प्रभू श्रीरामाने दशानन रावणाचा वध केला होता.
 
दशमी तिथी प्रारम्भ :- 23 ऑक्टोबर 2023 रोजी संध्याकाळी 05:44 पासून
दशमी तिथी समाप्त :- 24 ऑक्टोबर 2023 रोजी दुपारी 03:14 पर्यंत

दसरा कधी आहे - उदया तिथीप्रमाणे दसरा 24 ऑक्टोबर रोजी साजरा केला जाईल.
 
दसरा शुभ मुहूर्त
अभिजीत मुहूर्त : 11:42:40 ते 12:27:43 पर्यंत
विजयादशमी पूजा शुभ मुहूर्त : 24 ऑक्टोबर मंगळवारी 2023 रोजी दुपारी 02:05 ते 02:51 पर्यंत
अपराह्न पूजा वेळ : 24 ऑक्टोबर मंगळवारी 2023 रोजी दुपारी 01:19 ते 03:37 पर्यंत
साडेतीन मुहूर्त : दसर्‍याला साडे तीन मुहूर्तांपैकी एक असल्याने हा संपूर्ण दिवस शुभ असल्याचे मानले जाते.
 
दसरा पूजा पद्धत
दसऱ्याला घराच्या ईशान्य कोपर्‍यात आठ कमळाच्या पाकळ्या लावाव्यात. 
अष्टदलाच्या मध्यभागी अपराजिताय नमः या मंत्राचा जप करावा.
दुर्गा देवी आणि प्रभू श्रीरामाची पूजा करावी.
देवी आणि देवतांना कुंकू, अक्षता, फुले इतर अर्पण करून नैवेद्य अर्पण करावा. 
देवीची आरती करावी.
या दिवशी पुस्तकांची किंवा शस्त्रांची पूजा करण्यासाठी या वस्तू पूजास्थानी ठेवून त्यावर कुंकू आणि अक्षता वाहाव्या. 
यथाशक्ती दान व दक्षिणा द्यावी. गरीब व गरजूंना अन्नदान करावे. 
संध्याकाळी रावणाचे दहन करावे.
घरी परतल्यावर औक्षण करावे.
घरातील ज्येष्ठांना शमीची पाने देऊन आशीर्वाद घ्यावा.
दसरा हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक असल्याने शुभ मानलो जातो.
या दिवशी कोणत्याही शुभ अर्थात नवीन कार्य प्रारंभ करु शकतात.
या दिवशी वस्तू, वाहन तसेच दागिने खरेदी करण्याचे देखील महत्तव आहे.