बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ग्रहण
Written By अभिनय कुलकर्णी|

सूर्यग्रहणः इतिहासात डोकावताना....

NDND
* सूर्यग्रहण पाहिल्याची पहिली घटना ग्रीक इतिहासात सापडते. बेवोलियन लोक इसवी सन पूर्व २००० मध्ये सूर्यग्रहणाविषयी भविष्यवाणी करत होते, असे पुरावे सापडले आहेत.

* प्रसिद्ध ग्रीक दार्शनिक हेरोडोट्स यांनी थेल्सच्या युद्धाप्रसंगी असलेल्या ग्रहणाचे वर्णन केले होते.

* २१ ऑगस्ट १५६० मध्ये फ्रान्समध्ये लोकांनी ग्रहण काळात स्वतःला घरात बंद करून घेतले होते.

* इसवी सन पूर्व २१३६ मध्ये चीनमध्ये ग्रहण पाहिले जात होते, असे पुरावे सापडले आहेत.

* सर्वांत दीर्घ सूर्यग्रहण १९५५ मध्ये फिलिपाईन्समध्ये झाले. ते सात मिनिटे ५१ सेकंदांचे होते.

* १९७३ मध्ये कॉनकॉर्ड विमानातून ग्रहणमार्गात प्रवास करून तब्बल तीन हजार किलोमीटरपर्यंत ग्रहणाचा पाठलाग केला होता. त्यामुळे ७२ मिनिटे त्यांना ग्रहणाचा अभ्यास करता आला.

* सूर्यग्रहणाचा पहिला फोटो १८५१ मध्ये घेण्यात आला. सूर्यग्रहणाच्या अभ्यासात फोटोचा उपयोग १८६० पासून करण्यात येत आहे.

* ग्रहणात सूर्याच्या बाहेरच्या पृष्टभाघावर गुलाबी रंगाची आभा दिसते. त्यांना सोलर प्रामानेन्सिस म्हटले जाते. ऋग्वेदात सूर्याचे वर्णन करताना महर्षी अत्री यांनी याच आभेला रक्ताभमेष असे म्हटले आहे.

* ग्रहणाच्या अभ्यासानुसार हे स्पष्ट झाले आहे, की सूर्याच्या गोलाईत परिवर्तन होत असते.