सोमवार, 18 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Updated : मंगळवार, 28 मे 2024 (08:08 IST)

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर निबंध

Vinayak Damodar Savarkar
वीर सावरकर यांचे पूर्ण नाव विनायक दामोदर सावरकर असे होते . त्यांचा जन्म 28 मे 1883 रोजी महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील भगूर गावी झाला .त्यांच्या आईचे नाव राधाबाई सावरकर आणि वडिलांचे नाव दामोदरपंत सावरकर होते .ते अवघे नऊ वर्षाचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा सांभाळ त्यांचे थोरले बंधू बाबाराव आणि त्यांची पत्नी येसूवहिनी यांनी केला 
 
सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले ते लहानपणापासूनच अत्यंत बुद्धिमान होते वक्तृत्व काव्यरचना ह्यांवर त्यांचे प्रभुत्व होते .लहानग्या सावरकरांनी चाफेकर बंधूंना फाशी देण्यात येण्याचे वृत्त समजताच आपल्या कुलदेवी आई भगवती हिच्या पुढे  देशाच्या स्वातन्त्रतेसाठी क्रांतीचा सेतू उभारून मारिता-मारिता मरेतो झुंजेंन अशी शपथ घेतली.सावरकरांनी जोसेफ मॅझिनीयांच्या आत्मचरित्राचे मराठीत भाषांतर केले. यांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला. त्यांनी फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला नंतर ते उच्च शिक्षणासाठी लंडन ला गेले.
 
लंडनमध्ये इंडिया हाऊस मध्ये अभिनव भारताचे क्रांतिपर्व सुरू झाले जातीव्यवस्था मोडण्यासाठी त्यांनी सात बेड्या मोडायला हव्यात असे सांगितले. पॅरिस हुन लंडनला येताना सावरकरांना अटक करण्यात आली होती . पुढील खटला भारतात चालवला जावा म्हणून भारतात येताना त्यांनी फ्रान्सच्या मार्सेलिस बंदरात समुद्रात उडी घेतली पण त्यांचा तो प्रयत्न अयशस्वी ठरला.ब्रिटिश सरकारने  त्यांना अटक करून भारतात आणले.नाशिकला अनंत काणेकर यांनी नाशिकच्या जिल्ह्याधिकाऱ्याला गोळ्या घालून ठार केले. ब्रिटिश सैनिकांनी सावरकरांना अटक करून भारतात आणले इथे त्यांच्या वर खटला भरण्यात आला. त्यांना जन्मठेप म्हणून काळ्यापाण्याची शिक्षा देण्यात आली. मातृभूमीचे स्वातंत्र्य मिळविण्यासासाठी त्यांनी तब्बल 11 वर्षे छळ सहन करून देखील त्यांच्यात देश साठी करण्याची जिद्द होती. त्यांनी काळ्यापाण्यात असताना तुरुंगाच्या भिंतीवर महाकाव्ये लिहिली.
 
त्यांनी तुरुंगात काळे पाणी असे पुस्तकाचे लेखन देखील केले.त्यांचे गीत " ने मजसीने परत मातृभूमीला सागरा प्राण तळमळला " हे आजतायगत लोकांचा मनात अजरामर आहे.
 
अंदमानातून सुटल्यानंतर सावरकरांना ब्रिटिशांनी रत्नागिरीत स्थानापन्न  केले.त्यांनी हिंदूंच्या समाजाला संघटित करण्यासाठी अनेक कार्य केले.
त्यांनी रत्नागिरीमधील वास्तव्यामध्ये अनेक समाजसुधारणा केल्या जवळपास पाचशे मंदिर अस्पृश्यांसाठी खुले केली. अनेक आंतरजातीय विवाह लावले. अनेक सहभोजने आयोजित केली .त्यानंतर सर्वांसाठी पतित पावन मंदिर सुरू केले व सर्वांसाठी सामाईक भोजनालय सुरू केले जातिभेद तोडण्यासाठी सहभोजनाचे आयोजन केले. पतितपावन या मंदिरात सर्व जातींच्या लोकांना प्रवेश देणे सुरु केले.हे अखिल भारतीय हिंदू महासभेचे अध्यक्ष झाले. आणि भारत छोडो चळवळीचा भाग बनले.हे भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी जातिभेदाचा विरोध करणारे.क्रांतिकारक,भाषा शुद्धी लिपिशुद्धी,साहित्य प्रचारक असे अनेक पैलूंचे धनी होते. सावरकरांना ''स्वातंत्र्यवीर सावरकर ''अशी उपाधी प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिली होती.
त्यांनी अन्न आणि औषध वर्ज्य केले त्यामुळे त्यांची प्रकृती खालावली.24 फेब्रुवारी 1966 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आणि ते अनंतात विलीन झाले. 
 

Edited By- Priya Dixit