सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. मराठी निबंध
Written By
Last Modified: शुक्रवार, 15 जुलै 2022 (22:08 IST)

Marathi Essay on India’s National Emblem : मराठी निबंध भारताचे राष्ट्रीय प्रतिक

प्रत्येक देशाची खास परिस्थिती आणि तिची वैभवशाली ऐतिहासिकता आणि सांस्कृतिक चिन्हे राष्ट्रीय चिन्हे म्हणून वापरली जातात जी त्याची विशिष्ट ओळख व्यक्त करतात.

प्रत्येक स्वतंत्र राष्ट्रासाठी त्याच्या स्वतंत्र अस्तित्वाची ओळख म्हणजे काही प्रतीक असतात ,या मुळे त्या राष्ट्राची ओळख निर्माणहोते. त्यांच्या प्रतीकांमध्ये सर्वात मुख्य प्रतीक म्हणजे त्या राष्ट्राचा राष्ट्रीय झण्डा किंवा ध्वज.आणि त्याचे राज्य चिन्ह, त्याचे राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय कॅलेंडर, राष्ट्रीय नदी, भारतीय ध्वज, राष्ट्रीय मुद्रा, राष्ट्रीय फूल, राष्ट्रीय वृक्ष, राष्ट्रगीत, राष्ट्रीय खेळ, राष्ट्रगीत, राष्ट्रीय पक्षी, राष्ट्रीय प्राणी, हे महत्वाचे असतात. एखादा समारंभ असल्यास हे प्रतीक संपूर्ण देशाचे नेतृत्व करतात. हे प्रतीक त्या देशाचे महत्व दर्शवितात. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि ईशान्य गोलार्धात स्थित आहे. भारताच्या उत्तरेला हिमालय पर्वत आणि दक्षिणेला हिंदी महासागर, पूर्वेला बंगालचा उपसागर आणि पश्चिमेला अरबी समुद्र आहे.
 
जगातील जवळजवळ प्रत्येक देशाचा कारभार चालवण्यासाठी नियमांचा एक संग्रह बनवला जातो, ज्याला संविधान म्हणतात, त्यानुसार देशात कायदे आणि नियम बनवले जातात आणि शासन व्यवस्था 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारतीय राज्यघटनेद्वारे नियंत्रित केली जाते. 26 जानेवारी 1950 रोजी तो अंमलात आला.चला तर मग भारताचे राष्ट्रीय प्रतीकांची किंवा चिन्हांची माहिती जाणून घेऊ या.
 
1 भारतीय ध्वज-
स्वतंत्र आणि लोकतन्त्रात्मक धर्मनिरपेक्ष राष्ट्र भारताच्या विविध राष्ट्रीय प्रतिकांमध्ये राष्ट्रध्वजाचे सर्वात जास्त महत्त्व आहे. भारताचा राष्ट्रीय झेंडा किंवा ध्वज तिरंगा आहे. तिरंगा हा भारतीय राष्ट्रीय ध्वज मानला जातो. केसरी, पांढरा आणि हिरवा आणि पांढ-या रंगाच्या पट्टयात निळे अशोक चक्र आहे. ध्वजात तीनही रंग समान आकाराचे असून केशरी सर्वात वर पांढरा मध्यम आणि हिरवा सर्वात खाली आहे हे तीनही रंग भारताच्या समृध्दीचे प्रतिक मानल्या जातात.
 
केशरी शौर्याचे प्रतिक तर पांढरा शांती आणि सदाचाराचे प्रतिक, अशोक चक्र आपल्या विकासाच्या गतीचे प्रतिक आहे. हिरवा हरितक्रांती आणि भरभराटीचे प्रतिक मानले जाते. अशोक चक्रात 24 आरे आहेत. या चक्रास धर्मचक्र ही म्हणतात
 
2 राष्ट्र चिन्ह-
तीन वाघांच्या राष्ट्रीय प्रतिक चिन्हास महान सम्राट अशोक यांनी स्थापन केलेल्या सारनाथ येथील अशोक स्तंभावरील बोध चिन्हावरून घेण्यात आले. हे चिन्ह अशोक सम्राटांच्या काळात सुमारे इ.स.पूर्व 272 ते 232 मध्ये या चिन्हास मान्य करून त्यास सम्राट अशोकने सारनाथ येथील स्तंभावर स्थापित केले . या चिन्हावर मुख्यतः चार वाघांच्या मुखांना चहूबाजूस जोडले आहे.
 
याचे तीन मुख दिसतात. खाली अशोकचक्र व त्याच्या मागे पूढे घोडा, हत्ती, व बैल हे प्रतिक स्वरूप प्राणी आहेत. हे प्राणी देशाच्या प्रगतीचे, उत्कर्षाचे व संपन्नतेचे प्रतिक मानले जातात. या खाली सत्यमेव जयते असे लिहिलेले केले आहे. ज्याचा अर्थ नेहमी सत्याचा विजय होवो असा आहे. 26 जाने 1950 रोजी भारत सरकारने याला राष्ट्रीय प्रतिकचिन्ह म्हणून मान्य केले.
 
3 राष्ट्रीय पक्षी –
 1963 मध्ये मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले. मोर असा पक्षी आहे ज्याच्या मध्ये भारतीय संस्कृतीचे दर्शन घडते . मोराच्या सुंदरतेचे प्रतिक म्हणजे आपले समृध्द संविधान आहे. यासाठी मोराला राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित करण्यात आले.  
 
4 राष्ट्रीय कॅलेंडर –
22 मार्च 1957 साली राष्ट्रीय कॅलेंडर चा उपयोग होउ लागला होता जे शक येरा वर आधारित आहे. एका वर्षात 365 दिवस असतात असं  मानून याच्या तारखा ही ग्रेगोरियन कॅलेंडर सारख्याच होत्या. भारतीय हिंदू कॅलेंडरचा पहिला महिना चैत्र 21 किंवा 22 मार्च ला येतो भारतात सर्वत्र भारतीय राष्ट्रीय कॅलेंडर आणि ग्रेगोरियन कॅलेंडर चा वापर केला जातो.
 
5 राष्ट्रीय नदी –
गंगा ही भारताची राष्ट्रीय नदी मानली जाते ही भारतातील सर्वात मोठी आणि लांब नदी आहे. भारतीयांच्या मते ही सर्वात पवित्र नदी आहे.
 
6 राष्ट्रीय मुद्रा –
रूपया हा भारतीय राष्ट्रीय मुद्रा म्हणुन मान्य केले आहे. राष्ट्रीय रिजर्व बॅंक आॅफ इंडिया चे यावर नियंत्रण असते.
 
7 राष्ट्रीय फूल –
भारतात प्रत्येक मोसमात फूले येतात. काही सुगंधीत तर काही दिसायला आकर्षक असतात . भारताचे राष्ट्रीय फूल ‘कमळ’ आहे. प्राचीन काळापासुन कमळ भारतीय संस्कृतीचे एक घटक मानले आहे. हे सर्वप्रिय फूल आहे. कमळ हे फलदायक समृध्दी, ज्ञान, कोमलता आणि पवित्रता चे प्रतिक मानले जाते. पांढरे कमळ शांतीचे प्रतिक मानले जाते.
 
8  राष्ट्रीय वृक्ष –
वड हे भारताचे राष्ट्रीय वृक्ष मानले जाते. वडाच्या विविध गुणांमूळेच त्याची निवड झाली. वड शेकडो वर्षे जिवंत राहाते, त्याची सावलीमुळे  शांती आणि पवित्रतेची निर्मीती  होते. वडाच्या झाडाखाली शांती आणि समाधान मिळते. भारतीय हिन्दू धर्मात वडाचे झाड हे  पुजनिय मानतात. याच्या सांस्कृतिक महत्वामुळेच याला राष्ट्रीय वृक्षाचा मान मिळाला  आहे. 
 
9  राष्ट्रीय खेळ –
भारतात क्रिकेटचे वेड सर्वांचा असले तरी हाॅकी हा भारताचा राष्ट्रीय खेळ मानला जातो. भारतातच हाॅकीचा जन्म झाला. 1928 ते 1956 पर्यंत हॉकीच्या खेळात भारतीयच श्रेष्ठ मानले जातात.त्या नंतर जगाने या खेळाचा स्वीकार केला. सुरवातीला भारताने हाॅकीचे 6 सुवर्णपदक आपल्या नावे केले होते. हाॅकीमुळे भारताने जगात आपले नाव सुवर्ण अक्षराने नोंदवले आहे.
 
10 राष्ट्रगीत – 
“जन गण मन” हे आपले राष्ट्रगीत आहे. याची निर्मीती रवींद्रनाथ टैगोर यांनी केली. 26 जानेवारी 1950 रोजी याला भारताचे राष्ट्रगीत म्हणून मान्यता मिळाली. या गीतात समृध्द भारताची स्तूती करण्यात आली आहे.
 
11 राष्ट्रीय फळ –
आंबा त्याच्या विविध गुणांमुळे आणि त्याच्या सांस्कृतिक महत्वामुळे भारताचे राष्ट्रीय फळ म्हणून मान्यता मिळाली आहे. हे लोकप्रिय व सर्वांच्या आवडीचे फळ आहे. अकबर बादशहाने 100000 पेक्षा जास्त आंब्याची झाडे लावली होती. जेणे करून हे सर्व सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचावे.या पासून असंख्य खादयपदार्थ तयार करता येतात.
 
12 राष्ट्रीय प्राणी –
बंगाली वाघ याला राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्यात आली आहे. त्याची समृध्द शरीरयष्टी आणि जीवनमान यामुळे आणि प्राण्यांमध्ये सर्वात सुंदर असल्यामुळे वाघाची राष्ट्रीय पशु किंवा प्राणी म्हणून निवड झाली.
 
13 राष्ट्रीय स्मारक - भारताचे राष्ट्रीय स्मारक हे महान युद्ध स्मारक इंडिया गेट दिल्ली येथे आहे. हे स्मारक ब्रिटिशांच्या बाजूने पहिल्या जागतिक आणि अफगाण युद्धात भाग घेतलेल्या सुमारे 90000 भारतीय सैनिकांना समर्पित आहे.
 
इंडिया गेट 1931 मध्ये पूर्ण झाले. इंडिया गेटची पायाभरणी 1921 मध्ये न्यू ड्यूक ऑफ कनॉटने केली होती आणि त्याची रचना एडवर्ड लुटियन्सने केली होती.
 
1971 मध्ये झालेल्या भारत-पाक युद्धात शहीद झालेल्या शूर भारतीय वीरांना श्रद्धांजली अर्पण करून अमर जवान ज्योती स्मारक इंडिया गेटच्या कमानीखाली बांधण्यात आले.