रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By
Last Modified: गुरूवार, 16 फेब्रुवारी 2023 (22:09 IST)

Fasting Paneer Tikka उपवासाचा पनीर टिक्का

paneer tikka
साहित्य: 1/2 कप घट्ट दही, 200 ग्राम पनीर, उकळलेला बटाटा 1, कोथिंबीर, भोपळी मिरची 1, 2-3 हिरव्या मिरच्या, थोडंसं आलं, 1/2 लिंबू, लोणी, काळं मीठ चवीनुसार.
 
कृती: कोथिंबीर, हिरव्या मिरच्या आणि आलं वाटून घ्या. बटाटा आणि भोपळी मिरचीचे स्क्वेअर तुकडे कापून घ्या. पनीरचेपण मोठे स्क्वेअर तुकडे कापा. अता दह्यात मीठ, लिंबाचा रस, पनीर, वाटण आणि भाज्या मिसळून अर्ध्या तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून द्या. नंतर स्टिकमध्ये पनीर, भोपळी मिरची आणि बटाट्याचे तुकडे लावा. वरून लोणी लावून मायक्रोवेवमध्ये शेकून घ्या.