शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (11:46 IST)

कोथिंबीर निवडण्याची सोपी पद्धत, व्हिडिओ व्हायल

जर तुम्हाला हिरव्या कोथिंबीरशी संबंधित एक अतिशय सोपी पद्धत सांगितली तर कमालच वाटेल. या हॅक द्वारे कोथिंबीरची पाने सहजपणे वेगळी करू शकता.
 
कोथिंबीर मोठ्या प्रमाणावर वापरली जाते आणि ती भारतीय स्वयंपाकघरातील मुख्य गोष्ट मानली जाते. कोथिंबीर प्रत्येक ऋतूमध्ये वापरली जाते आणि चटणीपासून ते जेवण्याच्या अनेक पदार्थांना याची सजावट आणि चव वेगळाच मजा देते. 

कोथिंबिरी चवीला छान लागत असली तरी कोथिंबिरीची एक वाईट गोष्ट म्हणजे ती धुणे आणि त्याची पाने काढणे हे मोठे काम आहे. भरपूर कोथिंबीर असेल तर अजून वेळ लागतो. कोथिंबीरशी संबंधित अनेक हॅक आपण दररोज वापरत असतो, परंतु सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये कोथिंबीर काढण्यासाठी एक सोपा हॅक सांगण्यात आला आहे.
 
इन्स्टाग्रामवर व्हायरल झालेला या व्हिडिओला 150 दशलक्षपेक्षा जास्त वेळा पाहिला गेले आहे. या व्हिडिओमध्ये कोथिंबीर ताबडतोब वेगळी केली जात आहे.
 
हा व्हिडिओ पहा-
या व्हिडीओमध्ये कोथिंबीरची काडी एका टोपलीमधील छिद्रातून वेगळी केली जात आहे. ज्याने कोथिंबीरचे पाने टोपलीत जमा होत आहे आणि देठ वेगळे होत आहे. अशा प्रकारे कोथिंबीर काढणे सोपे दिसून येत आहे. इन्स्टाग्रामवर हा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.