किचनमधे झुरळ आणि मुंग्यांचा त्रास असेल तर..
दूध गरम करताना भांड्यावर लाकडाचा मोठा चमचा ठेवावा. याने दूध उकळून बाहेर सांडत नाही.
किचनमध्ये एखादे चिकटणारे पदार्थ पडल्यास त्याव ब्लीच टाकावे आणि नंतर ब्रशने स्वच्छ करावं. याने चिकटपणा दूर होतो.
फ्रिज आतून स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्यात बेकिंग सोडा वापरा. याने फ्रिज सोप्यारीत्या स्वच्छ होतं.
फरशी स्वच्छ करण्यासाठी एक कप व्हिनेगरमध्ये गरम पाणी टाकून फरशी स्वच्छ केल्याने चमक येते.
किचनमध्ये झुरळांमुळे परेशान असाल तर किचनच्या कोपर्यांमध्ये बोरिक पावडर शिंपडा. याने झुरळांचा त्रास नाहीसा होईल.
किचनमध्ये मुंग्या असतील तर ट्यूबलाइट किंवा बल्वजवळ कांद्याची एक किंवा दोन गाठी दोर्यात बांधून लटकवावी. याने मुंग्या गायब होतात.
इंस्टंट क्रिस्पी पॉटेटो चिप्स बनण्यासाठी बटाट्याचे पातळ स्लाइस कापून याला बरफाच्या पाण्यात जरावेळ ठेवावे. नंतर फ्राय करावे.