मंगळवार, 26 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: मंगळवार, 5 एप्रिल 2022 (22:19 IST)

kitchen Tips : नासलेले दूध फेकून देऊ नका, या पदार्थासाठी वापरा

milk boild
उन्हाळा येताच खाण्यापिण्याबाबत विशेष काळजी घ्यावी लागते. थोड्याशा निष्काळजीपणामुळे अनेक वेळा स्वयंपाकघरात ठेवलेले खाद्यपदार्थ खराब होतात. कधी कधी दुधासोबतही असे होते. जेव्हा आपण ते फ्रीजमध्ये ठेवायला विसरतो किंवा वेळेवर उकळतो आणि ते दूध नासते. दूध नासल्यावर आपण ते फेकून देतो .नासलेले दूध फेकून देऊ नका, या टिप्स अवलंबवून या पदार्थांमध्ये त्याचा वापर करा. चला तर मग जाणून घेऊ या. नासलेल्या दुधाचा वापर कसा करता येईल.
 
 1 पनीर बनवा -उन्हाळ्यात दूध नासले तर फेकून देऊ नका. त्यापेक्षा या नासलेल्या दुधापासून पनीर बनवा. जे खूप चवदार असेल. फक्त कापसाच्या कापडात फाटलेले दूध गुंडाळा आणि त्यावर जड वस्तू ठेवा. असे केल्याने दुधाचे पाणी पूर्णपणे बाष्पीभवन होऊन जाईल आणि पनीरला छान आकार मिळेल. 
 
2 सूप मध्ये वापर करा- जर सूप प्यायला आवडत असेल तर नासलेले दूध सूपमध्ये टाका. असे केल्याने सूपची चव दुप्पट होईल आणि ते फायदेशीर देखील होईल. 
 
3 दही बनवा - नासलेल्या दुधात दही घालून घरचे दही बनवू शकता. नंतर ते दही फेणून ताक बनवून हिंग ,जिरेपूड घालून थंडगार पिऊ शकता. किंवा दह्या चा वापर भाज्यांच्या ग्रेव्ही मध्ये करू शकता. 
 
4 केक मध्ये वापर- नासलेले दूध केकच्या पिठात घालून मिसळा, हे बेकिंग सोडा म्हणून काम करते आणि केक खराब होऊ देत नाही.  
 
5 स्मूदी बनवा- आइस्क्रीम ऐवजी, स्मूदीमध्ये नासलेले दूध घाला. ते आणखी मऊ आणि चवदार होईल.