1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शुक्रवार, 25 फेब्रुवारी 2022 (15:33 IST)

किचन टिप्स : अंडी उकडण्यासाठी ही सोपी पद्धत अवलंबवा,अंडी फुटणार नाही

Kitchen Tips: Use this simple method to boil eggs
काही किचन हॅक अशा असतात की त्या फॉलो केल्याने आपला बराचसा प्रयत्न तर वाचतोच पण आपला वेळही वाचतो. उदाहरणार्थ, जर आपल्याला अंड्याची करी बनवायची असेल, तर काहीवेळा असे होते की अंडी नीट उकळत नाहीत किंवा कधीकधी अंडी सोलणे खूप कठीण होते. अशा परिस्थितीत काही टिप्स फॉलो करून काम सोपे करू शकता.
 
* उकडलेले अंडे थोडे फोडा आणि थोडावेळ थंड पाण्यात टाका. त्याची साल सहज निघते. 
* जर अंडी फुटली असेल आणि तरीही उकळण्याची गरज असेल तर पाण्यात थोडे पांढरे व्हिनेगर घाला. यामुळे अंड्यातील द्रव बाहेर येणार नाही. 
* उकडलेले अंडे थंड झाल्यावर ते पुन्हा गरम करण्यासाठी मीठ भाजून घ्या आणि अंड गरम मीठावर ठेवा. यामुळे अंडी ताजी होईल. 
 
 अंडी उकळण्यासाठी 
प्रथम एका पॅनमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवा. लक्षात ठेवा की अंडी उकळताना अंडी बुडतील तेवढे पाणी घाला. आता अंडी एका मोठ्या भांड्यात उकळा. यामुळे अंडी एकमेकांना लागणार नाहीत, पाणी उकळायला लागल्यावर त्यात हळूहळू अंडी घाला. अंडी उकळताना गॅसची आच नेहमी मध्यम ठेवावी. आता या पाण्यात अर्धा चमचा मीठ टाका. अंडी सुमारे 15 मिनिटे उकळल्यानंतर गॅस बंद करा, आता अंडी गरम पाण्यातून काढून थंड पाण्यात टाका. सुमारे 10 मिनिटांनंतर, अंडी थंड पाण्यातून काढून टाका आणि सोलून घ्या. यामुळे अंड्याचे साल सहज निघून जाईल आणि सोलण्यासही सोपे जाईल.