सोमवार, 2 ऑक्टोबर 2023
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: बुधवार, 2 फेब्रुवारी 2022 (19:59 IST)

Kitchen Tips :या सोप्या टिप्स अवलंबवून जेवण्याची चव वाढवा

महिलांना किचन मध्ये जास्तवेळ द्यायचा असतो. दररोज स्वयंपाक करताना जेवणाला हेल्दी बनविण्यासह चविष्ट बनवणे हे अवघडच आहे. पण या सोप्या टिप्स अवलंबवून आपण अन्नाची चव वाढवू शकता. चला तर मग जाणून घेऊ या.
 
* बेचव डाळीला चविष्ट बनवा - वरण हे बहुतेक मुलांना आवडत नाही. वरणाची चव मुलांना आवडत नाही. आपल्या मुलांना देखील वरण आवडत नसेल तर वरणाची चव वाढविण्यासाठी आपण वरण शिजवायचा पूर्वी डाळ भाजून घ्या. 
 
* तांदूळ चिटकू नयेत- अनेकदा भात शिजवताना तांदूळ चिकटतो. अशा परिस्थिती त्याची चव खराब होते. आणि भात चिकट होतो. भात शिजवताना त्यात काही थेंबा गोड तेलाच्या घातल्याने भात चिकटणार नाही. 
 
 * वरणाच्या पाणीचा असा वापर करा- वरण किंवा भाजी उकळल्यावर त्यातील पाणी शिल्लक राहते. ते पाणी फेकून न देता त्या पाण्याने कणिक मळून घ्या. असं केल्याने त्यातील पोषक घटक वाया जात नाही. 
 
* ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी किसलेले खोबरे किंवा काजूची पेस्ट त्यात वापरा. असं केल्याने ग्रेव्हीची चव वाढेल आणि ग्रेव्ही घट्ट होईल.