गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. किचन टिप्स
Written By
Last Modified: शनिवार, 19 मार्च 2022 (09:27 IST)

किचन टिप्स: पॅनमध्ये तांदूळ चिकटत असेल तर असे करा

किचन टिप्स केवळ नवशिक्यांसाठीच नव्हे तर तज्ञ महिलांसाठी देखील उपयुक्त ठरतात. जर तुम्ही स्वयंपाकघरातील काही स्मार्ट टिप्स आणि युक्त्या शोधत असाल तर तुम्ही काही टिप्स अमलात आणू शकता. असे केल्याने तुमचा वेळ आणि एनर्जी दोन्ही वाचेल. आज आम्ही तुम्हाला अशाच काही ट्रिक्स सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे काम सोपे होईल आणि जेवणही चविष्ट होईल.
 
पॅनमध्ये तांदूळ चिकटत असतील तर हे करा- महिला अनेकदा तक्रार करतात की जेव्हा ते घरी तांदूळ किंवा नूडल्स शिजवतात तेव्हा ते भांड्याला चिकटतात. अशा स्थितीत तवा किंवा पॅन यावर तेल पसरवून मंद आचेवर गरम करून धुराचा रंग येईपर्यंत गरम करा नंतर हे तेल वेगळ्या भांड्यात काढून घ्या. यानंतर पॅन पुन्हा गरम करा. अशा प्रकारे तुमचा पॅन काही काळ नॉन-स्टिक प्रमाणे कार्य करेल. त्यामुळे भात आणि नूडल्स दोन्ही चिकटणार नाहीत.
 
पराठे चविष्ट होतील- पराठे चविष्ट होण्यासाठी पिठात किसलेले उकडलेले बटाटे घाला. 
पराठ्यांवर तेल किंवा तुपाच्या ऐवजी बटर लावल्यास जास्त टेस्ट येते.
 
टेस्टी भजी- भजी बनवताना त्यात चिमूटभर अरारूट आणि थोडेसे गरम तेल मिसळले तर भजी अधिक कुरकुरीत आणि चवदार होतात. भजी सर्व्ह करताना त्यावर चाट मसाला शिंपडा, त्यांना अधिकच चांगली चव येते.
 
मऊ तंदुरी: तंदुरी चपाती मऊ होण्यासाठी पीठ मळताना त्यात थोडे दही घालून कोमट पाण्याने पीठ मळून घ्यावे. तंदुरी चपाती मऊ आणि कुरकुरीत होईल