शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

शिंगाड्याची खांडवी

साहित्य : शिंगाडा पीठ 1 वाटी, गूळ एक वाटी, वाटीभर नारळाचे दूध, अर्धी वाटी नारळाचा चव, चिमूय मीठ, तूप, वेलची-जायफल पूड. 
 
कृती : नारळाच्या दुधात किसलेला गूळ घालून विरघळवून घ्या. त्यात हळूहळू हलवत शिंगाड्याचे पीठ घालावे. एकजीव करा. गुठळी होऊ देऊ नका. कढईत घालून शिजत ठेवावे. सारखे ढवळत राहावे. चमचाभर साजूक तूप, जायफळ, वेलची पूड, चिमूट मीठ घालावे. चांगले शिजून घट्ट झाल्यावर तूप लावलेल्या थाळ्यात ओतावे. वाटीला तूप लावून थापावे. वरून खोबरे भुरभुरावे. बदामाचे काप लावावेत व वड्या कापाव्यात