रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

उपवास रेसिपी : वरईची इडली

Navratri Festival 2020
साहित्य-
वरई एक वाटी
साबुदाणा अर्धा कप 
दही एक वाटी 
शेंगदाणा कूट दोन चमचे 
सेंधव मीठ चवीनुसार 
इनो अर्धा चमचा 
हिरवी कोथिंबीर एक चमचा 
जिरे अर्धा चमचा 
मिरे पूड 1/4 चमचा 
तूप आवश्यकतेनुसार
 
कृती-
सर्वात आधी वरई आणि साबुदाणा वेगवेगळा भिजत घालावा. भिजल्यानंतर त्यातील पाणी काढून टाकावे. 
आता साबुदाणा आणि वरई मिक्सरमधून बारीक करून घ्या. या मिश्रणात थोडं थोडं पाणी घालावे म्हणजे  गुळगुळीत आणि घट्ट पेस्ट तयार करता येईल. एका मोठ्या भांड्यात पेस्ट काढावी आणि त्यात दही घालावे व चांगले मिक्स करावे. यानंतर शेंगदाणा कूट,सेंधव मीठ, मिरे पूड आणि जिरे घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण 10-15 मिनिट भिजू द्यावे. आता इडली प्लेट्स घेऊन यामध्ये तेल लावावे. जेणेकरून इडल्या चिकटणार नाहीत. इडली बनवायची वेळ आली की पिठात इनो घाला आणि लगेच इडलीच्या साच्यात घालावे. स्टीमरमध्ये इडली स्टँड ठेवावे आणि 15-20 मिनिटे इडली वाफवून घ्या. इडली तयार झाल्यावर स्टँडवरून काढून थोडी थंड होऊ द्यावी उपवासाच्या इडलीला हिरव्या कोथिंबिरीने सजवा आणि नारळाची चटणी किंवा दह्यासोबत सर्व्ह करू शकतात. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik