suvichar
✕

शारदीय नवरात्री विशेष पाककृती उपवासाचा डोसा

Updated: सोमवार, 22 सप्टेंबर 2025 (07:45 IST)
 
साहित्य-
साबुदाणा-एक वाटी 
भगर किंवा राजगिरा पीठ-अर्धा वाटी
बटाटा 
जिरे-अर्धा टीस्पून
एक-हिरवी मिरची 
सैंधव मीठ 
पाणी गरजेनुसार
तेल किंवा तूप
ALSO READ: Navratri 2025 Kheer Naivedyam नवरात्रीत देवीसाठी या प्रकारे बनवा खीर
कृती-
सर्वात आधी साबुदाणा कमीतकमी पाच तास पाण्यात भिजवून ठेवा. नंतर पाणी काढून टाकून साबुदाणा मिक्सरमध्ये बारीक दळून घ्या. दळलेला साबुदाणा एका भांड्यात काढा आणि त्यात भगर किंवा राजगिरा पीठ मिसळा. मिश्रणात हळूहळू पाणी घालून डोश्याच्या पिठासारखी पातळ सरबरी तयार करा. पिठात गुठळ्या राहणार नाहीत याची काळजी घ्या.आता त्यात सैंधव मीठ, जिरे आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची   घाला. पिठाला दहा मिनिटे तसेच ठेवा.  आता नॉन-स्टिक तवा गरम करा. तव्यावर थोडे तेल किंवा तूप लावून पिठाचा पातळ थर पसरवा. व मध्यम आचेवर डोसा दोन्ही बाजूंनी खरपूस भाजून घ्या. डोसा सोनेरी रंगाचा आणि कुरकुरीत झाला पाहिजे. आता उकडलेल्या बटाट्यात सैंधव मीठ, जिरे आणि हिरवी मिरची मिसळा. डोसाच्या मधोमध हि भाजी ठेवून डोसा गुंडाळा. आता उपवासाचा डोसा गरमागरम शेंगदाण्याच्या चटणीसोबत किंवा दह्यासोबत सर्व्ह करा.  तसेच साबुदाण्याऐवजी फक्त राजगिरा किंवा भगरीचे  पीठ वापरूनही डोसा बनवता येतो.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
ALSO READ: शारदीय नवरात्री फराळाच्या यादीत ही खास रेसिपी लिहून घ्या
Edited By- Dhanashri Naik
ALSO READ: Sharadiya Navratri Recipe लोकप्रिय आणि पौष्टिक साबुदाणा खिचडी

सर्व पहा

Ganesh Chaturthi 2026 Sthapana Shubh Muhurat: १४ सप्टेंबर रोजी गणपती स्थापना शुभ मुहूर्त

देवांना अत्यंत प्रिय असणाऱ्या या फुलांच्या माळा अर्पण करा; मिळवा विशेष आशीर्वाद!

गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी ३ प्रकारच्या चॉकलेट मोदकांची रेसिपी

कॅल्शियमची कमतरता दूर करण्यासाठी रोजच्या आहारात हे पदार्थ खा; हाडे आणि दात राहतील मजबूत!

खाऊन योग करणे योग्य आहे की अयोग्य, जेवणानंतर योगा करण्याचे परिणाम जाणून घ्या

सर्व पहा

नैतिक कथा : गोष्ट चेटकीण आणि गुलाब फुलाची

गणपती बाप्पा आणि गौरीच्या प्रसादासाठी पौष्टिक ड्रायफ्रूट्स खजूर रोल पाककृती

सततचा खोकला हे फुफ्फुसाच्या कर्करोगाचे लक्षण आहे का? जाणून घ्या कर्करोगतज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला

श्री गणेशाच्या नैवेद्यासाठी केशरी खव्याचे लाडू, गणपती उत्सवामध्ये नक्की ट्राय करा

या पानांचे पाणी आरोग्यासाठी फायदेशीर? उकळून पिण्यापूर्वी जाणून घ्या संभाव्य फायदे

पुढील लेख
Show comments