Sharadiya Navratri Recipe लोकप्रिय आणि पौष्टिक साबुदाणा खिचडी
नवरात्रीच्या नऊ दिवसांच्या उपवासात सात्विक आणि पौष्टिक अन्नाला विशेष महत्त्व असते. साबुदाणा खिचडी ही एक लोकप्रिय आणि पौष्टिक उपवासाची डिश आहे. तर चला जाणून घ्या स्वादिष्ट आणि सोपी उपवासाची साबुदाणा खिचडी कशी बनवायची....
साहित्य-
एक कप- साबुदाणा
अर्धा कप- भाजलेले शेंगदाणे
एक- उकडलेला बटाटा
एक- हिरवी मिरची बारीक चिरलेली
अर्धा इंच- आले किसलेले
अर्धा चमचा- जिरे
एक चमचा- लिंबाचा रस
सेंधव मीठ
कोथिंबीर
एक चमचा- तूप
कृती-
सर्वात आधी साबुदाणा धुवून पाच तास किंवा रात्रभर भिजवून ठेवा जेणेकरून ते मऊ होईल. आता भिजवलेल्या साबुदाण्यात सेंधव मीठ, शेंगदाणे कूट आणि लिंबाचा रस मिसळा. तसेच एका पॅनमध्ये तूप गरम करा. त्यात जिरे आणि हिरव्या मिरच्या घाला. बटाट्याचे तुकडे घाला आणि हलके तपकिरी होईपर्यंत परतून घ्या. साबुदाण्याचे मिश्रण घाला आणि चांगले मिसळा.पॅन दोन मिनिटे झाकून ठेवा. वाफ भरू द्या. आता झाकण काढा व कोथिंबीर घाला आणि चांगले मिसळा. तर चला तयार आहे आपली गरमागरम साबुदाणा खिचडी रेसिपी.
टीप-
तुम्हाला हवे असल्यास साखरेची चव देखील घालू शकतात.
तसेच आवडप्रमाणे लाल तिखट देखील घालू शकतात.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
Edited By- Dhanashri Naik