सोमवार, 29 डिसेंबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By

खोबर्‍याच्या वड्या

Sweet Recipe Khobara Barfi
साहित्य: 2 वाट्या सुकलेल्या खोबर्‍याचा किंवा ओल्या नारळाचा किस, 2 वाटी साखर, 1 वाटी साजूक तूप, 2 वाटी खवा, वेलची पुड, चिमूटभर मीठ सजावटीसाठी काजू, बदामचे तुकडे आणि बेदाणे. 
 
कृती  : प्रथम कढईत साजूक तुपात खोबर्‍याचा किस छान खरपूस भाजून घ्या. नंतर हा भाजेलेला किस एका भांड्यात काढून घ्या. नंतर मंद आचेवर कढईत खवा भाजून घ्या. खव्याला हलकासा खरपूस रंग आला की त्यात साखर मिसळून ते मिश्रण एकजीव होईपर्यंत भाजा. 
 
त्यात वेलची पूड आणि चवी पुरते मीठ घाला. आता त्या मिश्रणात भाजेलेल्या खोबर्‍याचा किस मिसळून ते मिश्रण एकजीव करा. गॅस बंद करुन एका मोठ्या ताटास तुपाचा हात लावून त्यात ते मिश्रण ओतून समांतर थापून घ्या. आता त्यावर सजावटीसाठी वरुन काजू, बदामाचे तुकडे आणि बेदाणे पसरवा हलक्या हाताने थापून घ्या. थंड झाल्यावर त्याचे एकसारखे तुकडे करा.