Friend's zodiac sign व्हॉटस् युवर फ्रेंडशिप राशी?
आपल्या राशीच्या आधारे जाणून घ्या.... मित्र कोण आणि शत्रू कोण ?
मेष
या राशीचा स्वामी मंगळ आहे. मकर आणि कुंभ राशीच्या लोकांशी जुळत नाही. वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांशी कमी जुळते. बाकी राशीचे लोक मित्र असतात.
वृषभ
या राशीचा स्वामी शुक्र आहे. मकर आणि कुंभ राशीवाल्यांशी चांगली मैत्री जमते. मिथुन आणि कन्या राशीवाल्यांशी यथातथा जुळते. इतरांशी शत्रूता असते.
मिथुन
या राशीच्या स्वामी बुध आहे. कर्म रास वगळता इतर सर्वच राशीच्या लोकांशी मैत्री होते. हे कोणाशी शत्रुत्व करीत नाही. सगळ्यांशी मैत्री करण्याचा स्वभाव असतो.
कर्क
अतिशय नम्र स्वभाव असतो. सर्वाशी मैत्रीचे संबंध. कोणाशी शत्रूत्व नाही, परंतु मिथुन आणि कन्या राशीचे लोक यांच्याशी शत्रूत्व करतात.
सिंह
या राशीचे लोक इतरांशी कूप कमी मैत्री करतात. तूळ, मकर, कुंभ राशीवाल्यांशी शत्रुत्व, इतरांशी मैत्री.
कन्या
कर्क वगळता अन्य राशीच्या लोकांशी मैत्रीचे संबंध. मकर, कुंभ राशीच्या लोकांशी सम व्यवहार.
तूळ
या राशीचा स्वामी शुक्र आहे. या राशीचे लोक सिंह, मेष, वृश्चिक राशीच्या लोकांशी शत्रुत्व धरतात. मकर आणि कुंभ राशीच्या लोकांशी घनिष्ठ मैत्री.
वृश्चिक
या राशीचा स्वामी मंगळ. मकर आणि कुंभ राशीच्या लोकांशी घोर शत्रुता. वृषभ राशीच्या लोकांशी घनिष्ठ मित्रता.
धनू
मिथुन आणि कन्या राशीचे लोक या राशीच्या लोकांशी शत्रुत्व धरतात. मकर आणि कुंभवाल्यांशी हे सम राहतात. बाकी राशीवाल्यांशी यांची मैत्री असते.
मकर
या राशीचा स्वामी शनि आहे. हे लोक सिंह, मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांशी शत्रुत्व धरतात. इतरांशी मैत्री असते.
कुंभ
या राशीचा प्रभाव मकर राशीप्रमाणेच. हे लोक शांत स्वभावाचे असतात. सिंह, मेष आणि मंगळ स्वामी असलेल्याशी यांचे शत्रुत्व असते.
मीन
या राशीचा स्वामी गुरु आहे. मिथुन आणि कन्या या राशीच्या लोकांशी शत्रुत्व. मकर आणि कुंभ राशींशी सम आणि इतरांशी मैत्री.